

मुंबई: धारावी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार दिवसेंदिवस अधिक रंगतदार होत आहे. शिवसेनेचे उमेदवार राजेश खंदारे यांच्या समर्थनार्थ जनसमूह मोठ्या प्रमाणात वाढत आहे. धारावी मतदारसंघातील महिला मोठ्या प्रमाणात त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या असून त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा देत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहिणींना पाठिंबा देण्यासाठी श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृषाली श्रीकांत शिंदे यांनी निवडणुकीच्या प्रचार यात्रेत भाग घेतला. या वेळी धारावीच्या रस्त्यांवर महिलांचा मोठा लोंढा दिसून आला. प्रत्येकाच्या डोक्यावर भगव्या फेट्यांची शान दिसत होती, आणि या लोंढ्यात मुस्लिम महिलांचेही मोठे प्रमाण होते.
कोट: वृषाली श्रीकांत शिंदे म्हणाल्या,
“राजेश खंदारे हे शिवसेनेचे असे उमेदवार आहेत, जे धारावीची परिस्थिती बदलण्यासाठी पुढे सरसावले आहेत. आमच्या महिलांना आजपर्यंत त्यांचे हक्क मिळाले नाहीत. गेल्या १५ वर्षांपासून येथे विकास ठप्प झाला आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि प्रगतीसाठी महायुती सरकारला पुन्हा एकदा संधी द्यावी लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहिणींना न्याय देण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. यावेळी परिवर्तन घडेल, आणि ते परिवर्तन आमच्या भगिनीच घडवतील, यावर मला पूर्ण विश्वास आहे.”