तळमावले/वार्ताहर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम व जनजागृतीचे कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहेत. ‘उत्सव निवडणूकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ हे विशेष अभियान यंदा राबवण्यात आले आहे. येत्या बुधवार दि.20 नोव्हेंबर, 2024 रोजी मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याकरता पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील शेतीमित्र डाॅ.संदीप डाकवे यांनी स्वतःहून पुढाकार घेण्यात आला आहे. मतदान केल्यानंतर ‘बोटावरील मतदानाची शाई दाखवा आणि अक्षरगणेशा मिळवा’ असा अनोखा उपक्रम डाॅ.संदीप डाकवे यांनी राबवला आहे.
डाॅ.संदीप डाकवे हे गेली सुमारे 19 वर्षापासून अक्षरगणेशा उपक्रम राबवत आहेत. हा उपक्रम स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने राबवण्यात आला आहे.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपण डाॅ.संदीप डाकवे यांच्याकडून आपल्या आवडीच्या नावाचा, फर्मचा अक्षरगणेशा रेखाटून त्या बदल्यात त्यांना रुपये दोनशे पन्नास मूल्य द्यायचे आहे. एरवी याच अक्षरगणेशाचे मुल्य रु.पाचशे किंवा त्याहून जास्त असते. या उपक्रमातील सहभागामुळे आपणास अक्षरगणेशा मिळेलच, मात्र लोकशाहीच्या उत्सवात सहभागी झाल्याचे समाधानही मिळेल. या उपक्रमासाठी कलाकृती मुल्य संदीप राजाराम डाकवे, शाखा कराड, खाते क्रमांक. 248203100004990 आयएफएससी कोड एसआरसीबी 0000248 या अकाऊंटमध्ये जमा करायचे आहेत.
इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड मध्ये तीनदा, हायरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड मध्ये एकदा तर वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकाॅर्ड बुक मध्ये नाव नोंद केलेले डाॅ.संदीप डाकवे हे नेहमीच समाजोपयोगी विधायक उपक्रम रावबत असतात. या प्रयत्नाला समाजाचा चांगला पतिसाद मिळेल असा विश्वास शेतीमित्र डाॅ.संदीप डाकवे यांनी व्यक्त केला आहे. बोटावरील मतदानाची शाई दाखवा आणि अक्षरगणेशा मिळवा या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे (मो.9764061633) यांनी केले आहे.
