Friday, August 29, 2025
घरमहाराष्ट्रधारावीतील महिला, तरुण, कष्टकरी, कामगारांसाठी डॉ. ज्योती गायकवाड यांचे हमीपत्र 'लोकसेवेची सप्तसुत्री'.

धारावीतील महिला, तरुण, कष्टकरी, कामगारांसाठी डॉ. ज्योती गायकवाड यांचे हमीपत्र ‘लोकसेवेची सप्तसुत्री’.

मुंबई : काँग्रेसची पंचसुत्री व महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रनामा मधून जनतेला विकास व विश्वासाचे वचन दिलेले आहेच परंतु धारावी मतदार संघातील काँग्रेस मविआच्या उमेदवार डॉ. ज्योती गायकवाड यांनी हमीपत्र दिले असून धारावीच्या विकासाचा रोडमॅपच त्यांनी आखला आहे. धारावीतील प्रत्येक घटकाचा विचार करून ‘लोकसेवेची सप्तसुत्री’ हे हमीपत्र बनवले आहे. महाविकास आघाडी सत्तेत आल्यास धारावी पुनर्विकास प्रकल्प रद्द करु, असे आश्वासनही डॉ. ज्योती गायकवाड यांनी दिले आहे.

काँग्रेसने याआधीच महिलांसाठी महालक्ष्मी योजना जाहीर केली आहे तर धारावीसाठी ज्योती गायकवाड यांनी आणखी काही घोषणा केल्या आहेत. पीडित महिलांसाठी वन स्टॉप क्रायसिस सेंटर आणि धारावीच्या महिला उद्योजकांना मदत करणे, तरुणांसाठी टॅलेंट हंट आयोजित करण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील हिप हॉप महोत्सव, दरवर्षी साजरा करण्यात येणाऱ्या गुणगौरव पुरस्काराचा विस्तार करण्यात येणार असून सावित्रीबाई फुले अभ्यास केंद्र उभारण्यात येणार आहे. धारावीच्या रिसायकलिंग उद्योगासाठी नवे धोरण आणणार. धारावीतील कचरा व्यवस्थापनाची समस्या पाहून ज्योती गायकवाड यांनी त्यांच्या विकासनाम्यात नागरिकांना त्यांच्या तक्रारी लवकर नोंदवता याव्यात यासाठी ॲप बनवण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.

धारावीच्या मूलभूत प्रश्नांवर बोलताना डॉ. ज्योती गायकवाड यांनी धारावीतच सर्वांना घरे आणि दुकाने मिळतील, असेही सांगितले आहे. स्वत: डॉक्टर असलेल्या ज्योती गायकवाड यांनी धारावीमध्ये अनेक आरोग्य शिबिरे चालवली आहेत. आमदार झाल्यास वृद्धांसाठी मोफत आरोग्य सेवा आयोजित करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. लोकनेते एकनाथ गायकवाड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बनवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments