Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रअहमदनगर जिल्ह्यातील पतसंस्थेत गैरव्यवहार,पाच जणांना जन्मठेप १२ लोकांना शिक्षा

अहमदनगर जिल्ह्यातील पतसंस्थेत गैरव्यवहार,पाच जणांना जन्मठेप १२ लोकांना शिक्षा

प्रतिनिधी : राज्यातील काही वर्षांपूर्वी सहकारी पतसंस्थांचे पेव फुटले होते. अनेक ठिकाणी पतसंस्था स्थापन करुन सर्वसामान्यांकडून लाखो रुपयांच्या ठेवी जमा करण्यात आल्या. या ठेवीचा वापर संचालकांनी कर्ज वाटप करण्यासाठी केला. परंतु कोणतेही तारण न ठेवता, बनावट कागदपत्रांच्या आधारे स्वत: कर्ज घेतले तसेच आपल्या नातेवाईकांना कर्ज दिल्याचे प्रकार घडले होते. यामुळे राज्यातील अनेक पतसंस्था अडचणीत आल्या होत्या. आता या संचालकांना दणका देणारा निर्णय न्यायालयाने दिला आहे. अहमदनगर जिल्हा न्यायालयाने पाच जणांना जन्मठेपची शिक्षा दिली आहे. तसेच कर्ज न भरणाऱ्या १२ संचालक अन् कर्जदारांना शिक्षा ३ ते १० वर्षांपर्यंतची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पतसंस्था घोटाळ्यात जन्मठेपेची शिक्षा झालेला हा जिल्ह्यातील पहिलाच निकाल आहे.

कोणाला झाली शिक्षा
अहमदनगर शहरात संपदा नागरी सहकारी पतसंस्था होती. या पतसंस्थेतील घोटाळाप्रकरणी पाच जणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यात आरोपी ज्ञानदेव वाफारे, त्याची पत्नी सुजाता वाफारे, साहेबराव भालेकर, संजय बोरा, रवींद्र शिंदे अशी आरोपींची नावे आहेत. जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. आर. नाईकवाडी यांनी या सर्वांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. संपदा नागरी सहकारी पतसंस्था १९ हजारांहून अधिक ठेवीदारांच्या ठेवी अडकलेल्या आहेत.

कर्जदारांना दिला दणका
जिल्हा न्यायालयाने कर्ज न भरणाऱ्यांवर कारवाई केली. १२ संचालक आणि कर्जदारांना ३ ते १० वर्षांपर्यंतची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या सर्वांनी संपदा पतसंस्थेत १३ कोटी ३८ लाखांचा अपहार केला होता. या अपहार प्रकरणी २०११ मध्ये कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी १७ आरोपींना दोषी ठरविण्यात आले होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments