प्रतिनिधी : धारावी विधानसभ निवडणुकीची रणधुमाळीत प्रत्येक उमेदवार आपआपल्या पद्धतीने शक्ती प्रदर्शन करून दाखवत आहे. महाविकास आघाडी उमेदवार डॉ. ज्योतीताई गायकवाड यांची बुधवार १३ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी धारावी मध्ये महारॅली आयोजित केली होती. या रॅलीला तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, खा. वर्षाताई गायकवाड, महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. ज्योतीताई गायकवाड यांच्यासह विकास आघाडीचे सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. या रॅली ची सुरुवात त्रिकोणी गार्डन मुकुंद नगर येथील अशोक स्तंभाला अभिवादन करून करण्यात आली. यावेळी उमेदवार डॉ. ज्योतीताई गायकवाड यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे स्वागत केले. त्यानंतर रॅलीला सुरुवात होताच युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची एन्ट्री झाली. या सर्वावर शिवसेना युवा सेनेच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली.


युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे येणार म्हणून आज सकाळपासूनच शिवसेना युवा सेना चे सर्व पदाधिकारी त्यांचे स्वागत करण्यासाठी तयारी करत होते. दोन जेसीबीच्या साह्याने त्यांच्यावरती पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी शिवसेना युवा सेनेच्या वतीने आदित्य ठाकरे, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी डॉ. ज्योतीताई गायकवाड यांना भला मोठा पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले. ही रॅली धारावी मेन रोड वरून होळी मैदान, संत कक्कया मार्ग, गणेश विद्यामंदिर, कामराज हायस्कूल 90 फिट रोड , खांबदेव नगर येथे या रॅलीची सांगता झाली. या रॅलीला शिवसेनेचे माजी आमदार बाबुराव माने.विभाग संघटक विठ्ठल पवार, विभाग समन्वयक सुरेश सावंत, उपविभाग प्रमुख जोसेफ कोळी, प्रकाश आचरेकर, नगरसेवक वसंत नकाशे, शाखाप्रमुख सतीश कटके, आनंद भोसले, किरण काळे, बाबासाहेब सोनवणे,युवा सेना विभागप्रमुख सन्नी शिंदे,युवा सेना विभाग समन्वयक सतीश सोनवणे,महिला विभाग संघटक कविता जाधव, विभाग समन्वयक मायाताई जाधव, समाजसेविका वर्षा वसंत नकाशे यांच्यासह सर्व महिला आघाडी, काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
धारावी मेन रोड वरून होळी मैदान, संत कक्कया मार्ग, गणेश विद्यामंदिर, कामराज हायस्कूल 90 फिट रोड , खांबदेव नगर येथे या रॅलीची सांगता झाली. या रॅलीला शिवसेनेचे माजी आमदार बाबुराव माने.विभाग संघटक विठ्ठल पवार, विभाग समन्वयक सुरेश सावंत, उपविभाग प्रमुख जोसेफ कोळी, प्रकाश आचरेकर, नगरसेवक वसंत नकाशे, शाखाप्रमुख सतीश कटके, आनंद भोसले, किरण काळे, बाबासाहेब सोनवणे,युवा सेना विभागप्रमुख सन्नी शिंदे,युवा सेना विभाग समन्वयक सतीश सोनवणे,महिला विभाग संघटक कविता जाधव, विभाग समन्वयक मायाताई जाधव, समाजसेविका वर्षा वसंत नकाशे यांच्यासह सर्व महिला आघाडी, काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.