प्रतिनीधी : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात आणि महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या मुंबईमध्ये उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. मुंबईतील सर्वात चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे धारावी. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या या धारावी मध्ये गेले अनेक वर्ष पुनर्विकास झाला नसल्यामुळे या ठिकाणी पुनर्विकासाचा मुद्दा जास्त गाजत आहे. तसेच गेली 40 वर्ष मागील आमदारांनी धारावीचा काय विकास केला असा एखाद्या तरी उदाहरण जनतेने द्याव असा खुला प्रचार विरोध करत आहेत. महायुतीचे उमेदवार राजेश खंदारे यांनी देखील वंशवाद हटवा धारावी वाचवा असा नारा देत धारावी मध्ये घराणेशाही संपवला तरच धारावीचा विकास होईल नाहीतर तो कधीच होणार नाही. त्यामुळे विकासासाठी धारावीतील स्थानिक भूमिपुत्र असलेल्या माझ्यासारख्या सामाजिक सेवेत असणाऱ्या व्यक्तीला म्हणजे राजेश खंदारे यांना आपण निवडून द्यावे. एक संधी द्या, त्याचे सोने केल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचा प्रचार करत असल्यामुळे त्यांना जनतेचा पाठिंबा मिळत आहे. त्याचबरोबर महायुती सरकारने आणलेल्या लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, महिलांना एसटीमध्ये सवलत पुढे ही योजना कायम राहणार आणि मिळणाऱ्या रकमेत वाढ देखील करण्याचे आश्वासन सरकारने दिल्यामुळे याचा फायदा उमेदवार राजेश खंदारे यांना होत आहे. यामुळे त्यांचे जागोजागी स्वागत केले जात आहे. त्यामुळे खंदारे यांना उशिरा तिकीट मिळाली असली तरी त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. घरी जाऊन ते प्रचार करत असून त्याचा फायदा नक्कीच त्यांना या निवडणुकीत होणार आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचा सर्वात जास्त पाठिंबा महायुतीचे उमेदवार राजेश खंदारे यांना मिळत आहे.यावेळी धारावीत नक्कीच बदल होईल अशी चर्चा सध्या सुरू आहे.
