प्रतिनिधी : नवी मुंबई नेरूळ एम आय डी सी मधील व्हाईट हाऊस लाईव्ह ऑर्केस्ट्रा पहाटे पर्यंत सुरू असतो.येथे डान्स बार मध्ये आठ मुली पेक्षा जास्त मुली नसतात.मात्र या डान्स बार मध्ये वीस – वीस मुली या डान्स बार मध्ये पहाटे पर्यंत असतात.नियमानुसार हे डान्स बार हे रात्रौ १.३० वा.पर्यंत चालू असल्याचे परवाना दिले जातात.मात्र नवी मुंबईत पहाटे पर्यंत मोठ्या प्रमाणात हे डान्स बार सुरू असतात.याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे.पहाटे पर्यंत सुरू ठेवलेल्या डान्सबार वर पोलीस कारवाई करणार का ? असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत. अशा पहाटे पर्यंत चालत असलेल्या डान्स बार मुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मात्र सर्व नियमाला धाब्यावर बसवून नेरूळ, एम आय डी सी मधील व्हाईट हाऊस लाईव्ह ऑर्केस्ट्रा हा डान्स बार सुरू ठेवला जातो. याकडे प्रशासन लक्ष देणार का ? आणि कारवाई करणार का? असा प्रश्न सर्व सामान्य नागरिक विचारत आहेत. माजी गृहमंत्री आर आर पाटील यांनी डान्स बार बंद केले होते.मात्र अलीकडे जे सरकार सत्तेत येत आहे. ते फक्त उत्पादन शुल्क विभाग महसूल मिळावा या उद्देशाने हे डान्स बार पहाटे पर्यंत चालू ठेवले जातात.
नेरूळ,नवी मुंबई एम आय डी सी मध्ये उशिरा चालतात डान्सबार पोलीस कारवाई होणार का?
RELATED ARTICLES