Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रसातारचे महायुतीचे आ. भोसले यांच्या मताधिक्यासाठी परळी खोऱ्यात जनजागृती

सातारचे महायुतीचे आ. भोसले यांच्या मताधिक्यासाठी परळी खोऱ्यात जनजागृती

परळी(अजित जगताप) : सातारा जावळी विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणुकीचे वारे वाहत आहे . युवा नेते राजू भोसले व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली कमळ चिन्हाचा सुगंध सर्व दूर पसरत आहे. किमान लाखभर मताधिक्य मिळवण्यासाठी संपूर्ण मतदारसंघात प्रयत्न सुरू झालेले आहेत. यामध्ये परळी विभागाने बाजी मारली आहे. महायुतीचे भाजपचे उमेदवार श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मताधिक्य देण्यासाठी जनजागृती सुरू झालेले आहे.
परळी विभागामध्ये प्रत्येक गाव वाडी वस्ती या ठिकाणी आमदार विकास निधी व व्यक्तिगत सुखदुःखामध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले प्रत्येक वेळी धावून आलेले आहेत. त्यामुळे आमदार भोसले म्हणजेच लोकप्रतिनिधी असे समीकरण झाले असल्याचे मत श्री सुरेश सावंत यांनी परळी येथे झालेल्या मागासवर्गीय बांधवांच्या मेळाव्यात स्पष्ट केले. छत्रपती घराण्याच्या सामाजिक कार्याचा वारसा लाभलेल्या आमदार भोसले यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदी बौद्ध समाजाचे अभ्यासू कार्यकर्ते सुरेश सावंत यांना संधी दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची उतराई होण्यासाठी संपूर्ण बौद्ध समाज त्यांच्या पाठीशी ठाम राहील असा विश्वास महेंद्र सकपाळ संजय सोरटे यांनी व्यक्त केला आहे. परळी विभागातील बनघर, परळी, जांभे गजवडी कुरूळ पाटेकर वेणेखोल वडगाव चिखली रोहत नेत्रळ कडगाव सावंतवाडी कारी व

परळी खोऱ्यामध्ये राजकीय साक्षरता मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे आमदार भोसले यांच्या विजयासाठी सर्व ग्रामस्थ सहभागी होत आहेत. सध्या परळी विभागातील विजय गायकवाड, जे.बी. सपकाळ, राजेंद्र सपकाळ, अण्णा भंडारे, संतोष सपकाळ, योगशे सपकाळ, दिलीप सोनवणे, अजित कांबळे, प्रशांत सोनवणे, सागर सपकाळ ,शिवाजी जाधव ,सुनील जाधव, अरुण सावंत, आर वाय जाधव व महिला वर्ग ,ज्येष्ठ नागरिक परळी विभागात प्रत्येक उंबरठ्यापर्यंत पोहोचून कमळ या चिन्हाचा उल्लेख करत आहे . निवडणुकीची औपचारिकता बाकी असून लाखभर मताधिक्य यासाठी परळी विभाग खारीचा वाटा उचललेला जाईल असा विश्वास जिल्हा बँकेचे संचालक सुरेश सावंत यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments