मुंबई (शांताराम गुडेकर ) : विक्रोळी टागोर नगर.सामाजिक जाणिव जागृत करणारी, नेत्रदान अवयव दान देहदान या कार्यात गेली २४.वर्षे कार्यरत असलेल्या स्नेहदा या संस्थेच्या स्नेहदा दिवाळी अंकाचे प्रकाशन नुकतेच संदेश विद्यालय, टागोर नगर विक्रोळी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. या वेळी स्नेहदाचे संस्थापक संपादक श्री उमाकांत सावंत यांनी सर्व उपस्थितांना धन्यवाद दिले. कार्यक्रमा साठी ज्येष्ठ साहित्यिक कवी अशोक लोटणकर, शिक्षणाधिकारी डाॕ. जिवबा पेडणेकर, प्रा.हेमंत सामंत आणि लेखक कवी प्रा. वैभव साटम उपस्थित होते.
डाॕ. जिवबा पेडणेकर यांनी वाचन संस्कृती आणि वाचनाचे महत्त्व यावरआपले विचार मांडले. प्रा.हेमंत सामंत यांनी वाचन संस्कार या बरोबरच साहित्यातील वेगवेगळे प्रवाह आणि घडामोडींचा आढावा घेतला. प्रा. वैभव साटम यांनी दिवाळी अंकांची महती, संस्कृती आणि पहिला दिवाळी अंक याचे महत्त्व विशद केले.आणि स्नेहदा दिवाळी अंकातील सामाजिक चळवळीच्या लेखांचा आढावा घेतला. तर कवी अशोक लोटणकर यांनी स्नेहदा संस्थेची सामाजिक चळवळ, देहदान, अवयव दान, नेत्र दान या कार्यातील पुढाकारा बद्दल श्री उमाकांत सावंत आणि त्यांचे सहकारी यांचे आभार मानले. शेवटी काही सदस्यांनी कविता, गझल सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढविली. उमाकांत सावंत, प्रभाकर रामराजे, कार्यकारी संपादक सुनील कुबल यांचेसह अन्य मान्यवर या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित होते.