प्रतिनिधी : श्री संत कृष्णदास सत्संग मुंबई आयोजित सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील कार्तिकी एकादशी निमित्त ज्यांना पंढरपूर वारी आषाढी एकादशी किंवा कार्तिकी एकादशी वेळी कामाच्या व्यापामुळे जाता येत नाही.अशा मुंबईतील वारकरी भक्तासाठी या दिंडीचे आयोजन केले जात असते. मीनाताई फुल मार्केट प्रभादेवी रोड – दादर ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, डी. एल.रोड,दादर येथे पर्यंत हा दिंडी सोहळा मंगळवार दि.१२ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ८.३० वाजता. आयोजित करण्यात आला आहे. पारंपारिक पद्धतीने वेशभूषा, जागोजागी रांगोळी प्रदर्शन, बँड बाजा तसेच टाळ मृदंगाच्या जय घोषात ही पायी दिंडी दादर येथील मीनाताई फुल मार्केट येथून सकाळी ८.३० वाजता दिंडीचे प्रस्थान होईल. हा दिंडी सोहळा सेनापती बापट मार्ग, दादर रेल्वे स्टेशन, फुल मार्केट, कामात हॉटेल, कबूतर खाना, एन सी केळकर मार्ग, रानडे रोड, डी. एल. वैद्य रोड येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे पायी दिंडी सोहळ्याची सांगता होईल. या सोहळ्याला मुंबईतील सर्व भाविक भक्तांनी, वारकरी संप्रदायातील माउलींनी सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन श्री संत कृष्णदास सत्संग मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे.
दादरमध्ये कार्तिकी एकादशी निमित्त पायी दिंडी आज सोहळा
RELATED ARTICLES