Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रनेरळ कोदिवले येथील शेतक-याच्या भात पिकाची काही समाजकंठकाकडून राख रांगोळी

नेरळ कोदिवले येथील शेतक-याच्या भात पिकाची काही समाजकंठकाकडून राख रांगोळी

नेरळ – दहिवली ग्रामपंचाय हद्दितील कोदिवले येथे आज अतिशय निंदनीय आणि संतापजनक प्रकार काही अज्ञात समाजकंठकांकडून घडविण्यात आला आहे. श्री.भगवान लक्ष्मण तरे, श्री.केशव लक्ष्मण तरे, श्री.नाना लक्ष्मण तरे आणि श्री.संतोष लक्ष्मण तरे यांच्या सामाहिक भात शेतीतून पिकविलेल्या भात धान्याची कापणी करून शेतावर भारे साठवून ठेवण्यात आले होते. आज पहाटे 3.30 ते 4 च्या सुमारास काही अज्ञात विकृत वृत्तीच्या प्रवृत्तींनी हे वर्षभर पिकविलेले धान्य पेटवून देत राख रांगोळी केली आहे. सदर प्रकाराची माहिती कुटूंबियांना मिळताच त्यांनी शेतावर धाव घेतली पंरतू तोपर्यत सर्व जळून खाक झाले होते. समस्त प्रकार हा राजकीय वैमानस्यातून घडल्याची चर्चा सर्वत्र सुरू असून या प्रकाराचा सर्वत्र निषेध नोंदवला जात आहे.

वर्षातून एकदाच भाताचे उत्पन्न घेऊन वर्षभर उदरनिर्वाह होईल इतके धान्य पिकवून हे कुटूंब आपला उदरनिर्वाह करत असते. आधीच, नैसर्गिक संकटांनी शेतकरी हवालदिल झालेला असताना अशाप्रकारची घटना घडवून साक्षात अन्नाला पायदळी तुडवून राखरांगोळी करण्याचा अतिशय निंदनीय आणि विकृत प्रकार तालुक्यात घडला आहे. आज या शेतक-यांनी काबाडकष्ट करून पिकविलेला तोंडाशी आलेला घास असा काही नराधमांनी हीन कृत्य करत नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याची, पोलिसांमार्फत सखोल चौकशी होऊन ज्या कोणी हा प्रकार केला आहे तो जनतेसमोर येणे गरजेचे आहे अशी मागणी सर्व स्तरावर होत आहे.

या घटनेबाबत बोलताना अँड.पंकज भगवान तरे यांनी सांगितले की, मागे काही महिन्यांपुर्वी आमच्या शेतावरील बोअरवेल मधील मोटार काढुन चोरून नेली व त्याचबरोबर बोअरवेल मध्ये दगड टाकून त्याचेही नुकसान करण्यात आले होते. आता तर अत्त्योच्च गाठत वर्षभराच्या आमच्या अन्नधान्याची नासधूस करून त्याची राख रांगोळी करण्यात आली आहे. हा पुर्ण प्रकार राजकीय वैमानस्यातून केला असल्याची दाट शक्यता आम्हाला वाटते तसेच अशाप्रकारच्या घटना घडवून अन्नाची नासधूस म्हणजे एकप्रकारे माता लक्ष्मीची विटबंनाच आहे. ज्या कोणी नराधम आणि नपुसंक वृत्तीने हा प्रकार केला आहे त्यांनी लक्षात ठेवावे की असे करून आमचे कुटूंब उपाशी राहणार नसून ज्यांनी हे पाप घडवून आणले आहे त्यांना याचे प्रायचित्त इथेच फेडावे लागणार आहे. आम्ही पोलिस प्रशासनाला विनंती करतो की या प्रकरणाची सखोल चौकशी करून लवकरात लवकर गुन्हेगारांना सर्वांसमोर आणावे अन्यथा आज आमचे नुकसान झाले आहे उद्या परिसरातील इतरांचेही नुकसान करतील. म्हणून अशा प्रवृत्तीला वेळीच ठेचून आळा घालणे आवश्यक आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments