मुंबई(सागर बोबडे) : मुंबई गोरेगाव येथील यशोधाम सोसायटीमध्ये राहत्या घरामध्ये अभिनेते नितीन कुमार सत्यपाल सिंग यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे याबाबत सखोल तपास पोलीस अधिकारी करत आहेत

प्राप्त माहितीनुसार गोरेगाव येथील यशोधाम आपारमेंट मध्ये राहणारे टीव्ही आणि चित्रपटा त अनेक भूमिका बजावणारे 35 वर्षीय अभिनेता नितीन कुमार सत्यपाल सिंग हे आजारी होते दरम्यान त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि चित्रपटांमध्ये आणि टीव्ही मालिकांमध्ये सध्या त्यांच्याकडे काम नसल्याने मानसिक तणावात ते वावरात असल्याने त्यांना गोष्टीशी सामना करावा लागत होता नितीन कुमार सिंग यांची पत्नी त्यांच्या मुलीला उद्यानात फिरवण्यासाठी बाहेर गेली असता घराचा दरवाजा उघडत नव्हता यावेळी त्यांनी आजूबाजूच्या लोकांना बोलून दरवाजा उघडला असता त्यांनी पाहिले की गळफास घेऊन त्यांच्या पतीने आत्महत्या केली आहे याबाबत पुढील तपास पोलीस अधिकारी करत आहेत अनेक दिवसापासून त्यांना चित्रपटात ठेवी मालिकात काम मिळत नसल्याने त्यांच्यावर निराशातील सदर आत्महत्या केल्याचे दिसून येते असल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे