प्रतिनिधी : धारावी विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये एकूण बारा उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. मात्र यामध्ये खरी लढत महाविकास आघाडी महायुती आणि बहुजन समाजवादी पार्टीचे उमेदवार यांच्यामध्ये होणार आहे.


बहुजन समाजवादी पार्टीचे उमेदवार म्हणून रायबागे यांची आज प्रभाग क्रमांक १८८ मध्ये प्रचार रॅली आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या प्रभागातील मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. आणि आपला पाठिंबा रायबागे यांना दिला. या प्रचार रॅलीला शेतकरी कामगार पक्ष सह बहुजन समाजवादी पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुस्लिम बांधव या रॅलीत सहभागी होऊन धारावीत बदल हवा म्हणून आपला पाठिंबा श्री मनोहर रायबागे यांना देत असल्याचे चित्र बघायला मिळत होते.