प्रतिनीधी : विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर उमेदवार निश्चित झाले. प्रत्येक उमेदवाराला आमदार बनायचे असल्याने मतदारांना आमिष दाखवण्याचे प्रकार अनेक ठिकाणी उघडकीस आले आहेत.करोडो रुपये पकडले आहेत.असाच प्रकार काही उमेदवार भेटवस्तू देऊन ही आमिष दाखवत आहेत. धारावी मध्ये सुध्दा हा प्रकार घडला आहे.विरोधकांकडून मतदारांना वेगवेगळी आमिषे दाखवली जात आहेत. शिवसेनेचे उमेदवार राजेश खंदारे यांच्याकडून मतदारांना भेट वस्तूंचे वाटप केले जात आहे. शुक्रवारी रात्रीही असाच प्रकार उघडीस आला असून उमेदवार राजेश खंदारे यांचे भाऊ प्रदिप खंदारे यांच्या मालकीच्या हॉलमध्ये वार्ड क्रमांक १८६ च्या शिंदे शिवसेनेच्या शाखा प्रमुख सुनिता कैलास सोनटक्के यांच्या उपस्थितीत महिलांना भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले. हा आदर्श आचारसंहितेचा भंग असून याबाबतची रितसर तक्रार काँग्रेस पक्षाने निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली असून शिवसेना उमेदवार राजेश खंदारे यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
धारावीत शिंदे गटाकडून महिलांना भेट वस्तू वाटप निवडणूक आयोगात तक्रार; कारवाईची मागणी
RELATED ARTICLES