सातारा(अजित जगताप) : सातारा शहर नगरपालिका व परिसरातील नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात. यासाठी जागरूकतेने काम करणाऱ्या सातारा शहर सुधार समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते महाविकास आघाडीचे शिवसेना (उबाठा) सातारा जावळीचे उमेदवार अमित जी कदम यांच्या मशाल चिन्हाच्या प्रचारा निमित्त परिसर पिजून काढत आहेत .त्यांना उदंड प्रतिसाद लाभत आहे. सातारा शहर हे छत्रपतींची राजधानी असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक प्राप्त केलेले आहे. इतिहासाने गौरव केला पण वर्तमान सत्ताधाऱ्यांनी हे आपल्या ठेकेदारी कर्तबगारीने या शहराची अवस्था बिकट केली आहे. या विरोधात आता शहर सुधार समितीचे पदाधिकारी रिंगणात उतरले आहेत. मुळातच सातारा शहरापुरती मर्यादित असलेल्या नगर पालिका मध्ये नागरी सुविधांचा अभाव आहे. लोकांच्या आरोग्यासाठी निम्मी रोजंदारी व वेतन खर्च करावी लागत आहे. याचे गांभीर्य नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांना राहिलेले नाही. भ्रष्टाचाराचे प्रतीक म्हणून नगरपालिका इमारतीकडे पाहिले जाते. अनेकदा रस्त्यावर आंदोलन करावी लागलेली आहे. तरीही काही जणांना सत्तेची भूक संपलेली नाही. त्यामुळेच तर महाविकास आघाडीच्या मशाल या चिन्हाला उदंड प्रतिसाद लाभत आहे. हे आता लपून राहिलेले नाही.
काही प्रसार माध्यमातून ही गोष्ट पोहोचू शकत नाही कारण, नकारात्मक गोष्टी सामान्य जनतेपर्यंत पोहोचू नये यासाठी सर्व दरवाजे खिडक्या व लहान लहान होल सुद्धा लिपण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी इमाने इतबारे केले आहे. असं आता काही अभ्यासक सांगू लागलेले आहेत. याबाबत मतभेद असू शकतात. परंतु, सत्य हे सत्य असते. ते लोकांच्या मुखातून बाहेर पडू लागलेले आहे. ज्यांच्याकडे सत्ता आहे. त्यांच्या विरोधात अनेकदा सातारकरांना रस्त्यावर उतरावे लागलेले आहे. त्याचे मात्र काही प्रामाणिक प्रसारमाध्यमध्ये चांगली प्रसिद्धी दिलेली आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद देणे त्यांचे हक्क आहे. आज सातारा शहर सुधार समिती प्रचारामध्ये निस्वार्थीपणाने काम करत आहे. त्यामुळे सुज्ञ नागरिक सुद्धा स्वखर्चाने त्यांचे मुद्दे ऐकून घेऊन त्यांना चहापान सुद्धा करत आहे. हा परिवर्तनाचा बदल मनाला दिलासादायक असल्याचे मत शहर सुधार समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. गेली आठवड्याभरापासून शहर सुधार समिती दिलेल्या शब्दाप्रमाणे निस्वार्थीपणाने महाविकास आघाडीचे उमेदवार अमित जी कदम यांच्या मशाल चिन्हाचा प्रचार करत आहेत. या प्रचार यंत्रणेमध्ये शहर सुधार समितीचे संयोजक निमंत्रक तथा कार्यकर्ते तसेच विजय निकम, असलम तडसरकर, विक्रांत पवार ,शिरीष जंगम व ज्येष्ठ नागरिक सहभागी होत आहेत. मुळातच सातारा शहराच्या हद्द वाढीला शहर सुधार समितीचा अभ्यासपूर्ण विरोध आहे ही हद्द वाढून जनतेला आणखीन वेठीस धरत आहेत असाही त्यांनी आरोप केला आहे. दरम्यान, सातारा शहर परिसरात प्रचार यंत्रणेसाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे उत्तम जाधव, हनुमंतराव पवार , काशिनाथ शिंदे व महिला वर्ग आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे सातारा जिल्हा अध्यक्ष अमोल पाटोळे, अल्पसंख्यांक समाजाचे शफिक शेख, इतर मागासवर्गीय समाजाचे बाळासाहेब शिंदे व राष्ट्रीय काँग्रेसचे रजनी पवार, मनोज कुमार तपासे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, साहेब शिंदे यांच्यासह मान्यवर प्रचार यंत्रणेत स्वयंस्फूर्तीने प्रचार यंत्रणेमध्ये सहभागी होत आहेत. त्यांचे जागोजागी स्वागत होत आहे.
