प्रतिनीधी : धारावी विधानसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. ज्योतीताई गायकवाड यांची प्रचार रॅली प्रभाग क्रमांक 183 मध्ये आयोजित करण्यात आले होते. ही रॅली पारसी चाळ, गोल्ड फील्ड इमारत, काळा किल्ला या परिसरामध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात बघायला मिळत होती. तेवढ्याच संख्येने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेक ठिकाणी डॉ. ज्योतीताई गायकवाड यांचे औक्षण करण्यात आले. मतदारांनी त्यांना आशीर्वाद दिले


रॅलीमध्ये बोलताना डॉ. गायकवाड यांनी आमची लढाई ही आदानी बरोबर आहे, त्यामुळे माझ्यासमोर कोण उभा आहे याची मला चिंता नाही. धारावी परिवार आहे आणि तो माझ्यासोबत आहे. त्यामुळे ‘हम सब एक है’ असा नारा दिला. नई रोशनी लायी है, ज्योतीताई आयी है….अशा घोषणांनी परिसर दणाणून जात होता.