प्रतिनीधी : धारावी विधानसभा निवडणूक चुरशीची होत चालली आहे. यामध्ये महाविकास आघाडी, महायुती आणि बहुजन समाजवादी पार्टी यामध्ये लढत असली तरी तिन्ही पक्षाने प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यामध्ये बहुजन समाजवादी पार्टीचे उमेदवार मनोहर रायबागे यांच्या प्रचार रॅलीला उदंड प्रतिसाद मिळत आहे. धारावीतील प्रभाग क्रमांक 183 मध्ये रायबागे यांच्या रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती जाणवत होती. आणि जागोजागी रायबागे यांचे जंगी स्वागत करण्यात येत होते. त्यामुळे महाविकास आघाडी, बहुजन समाजवादी पार्टी आणि महायुती यामध्ये चुरस बघायला मिळणार आहे. निवडणूक 20 नोव्हेंबरला असली तरी आतापासूनच प्रचाराला रंगत आलेले चित्र धारावीत दिसत आहे.
धारावीत मनोहर रायबागे यांच्या प्रचार रॅलीला प्रचंड प्रतिसाद
RELATED ARTICLES