प्रतिनिधी : ऐरोली विधानसभेत गणेश नाईक, विजय चौगुले आणि अंकुश कदम यांच्यामध्ये तिरंगी सामना रंगणार असून, हे तिन्ही उमेदवार आपाआपल्या समाजातील नागरिकांच्या मतदानाला घेऊन आत्मविश्वास बाळगून आहे. त्यामुळे, येथील निवडणुकीत ‘जात’ फॅक्टर महत्वाचा ठरणार आहे.
ऐरोली विधानसभेवर कायम ‘नाईक’ परिवाराचे वर्चस्व राहिले आहे. हा विधानसभा नव्याने निर्माण झाल्यापासून आधी संदीप नाईक व नंतर गणेश नाईक यांनी येथील आमदारकी भूषवली आहे. यावेळी मात्र घराणेशाहीला थेट भिडण्याची तयारी महायुतीचे बंडखोर अपक्ष उमेदवार शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी दर्शवली आहे. तर, दुसरीकडे मराठा आंदोलनातून उदयास आलेले महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अंकुश कदम यांनीही दंड थोपटले आहे. या दोघांनीही भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे उमेदवार गणेश नाईक यांना कडवे आव्हान उभे केले आहे. भाजपचे गणेश नाईक हे स्थानिक भूमिपुत्र असून ते आगरी समाजातून येतात. तर, बंडखोर अपक्ष उमेदवार विजय चौगुले हे वडार समाजाचे नेतृत्व असून, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अंकुश कदम आमदार झाल्यास ते विधानसभेतील मराठा समाजाचे भाग्यविधाते ठरतील अशी चर्चा आहे. त्यामुळे, ऐरोली विधानसभेतील निवडणूक हि पक्षविरहित आणि जात व समाज प्रतिष्ठेची ठरणार आहे.
ऐरोलीत ‘जातीय प्रतिष्ठे’चा तिरंगी सामना रंगणार
RELATED ARTICLES