प्रतिनीधी : श्री निनाई देवी विद्यालयाच्या जुन्या आठवणी ताज्या करत आर बी पाटील सर यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना त्यावेळचे शिक्षण आणि आत्ताचे शिक्षण यातील फरक समजून दिला. जीवनात शिक्षण घेत असताना आणि अडचणीला सामोरे जात वेगवेगळ्या संधीचा शोध घेत आपल्या अस्तित्व निर्माण करावे लागते याबद्दल माहिती दिली. कुलकर्णी सरांनी आपल्या कौशल्यपूर्ण शैलीत विद्यार्थ्यांचे मनोज कर जीवनातील अनुभव सांगितल्याने मुलांच्या चेहऱ्यावर एक अनोखी हास्य निर्माण झाले. शेवाळे सर त्यावेळी कडक आणि आजही कडक आपल्या स्वभावात शिक्षणाबाबत माहिती सांगत असताना मुलं घडवण्यासाठी कडकपणा असला पाहिजे. त्याशिवाय विद्यार्थी घडत नसतात .तसेच खोचरे सर यांनी आपल्या तिन्ही सहकारी शिक्षकांचे कौतुक करत आपल्या प्रेमळ भूमिका पार पाडली विद्यालयाचे कर्मचारी मुलांचे आवडते हनमंत भाऊ अत्यंत मनमिळाऊ व्यक्तिमत्व मुला मुलांच्या विद्यालयातील आधार त्यांनी आपले मनोगत थोडक्यात व्यक्त केली प्रास्ताविक माध्यमिक यांनी केले प्रस्ताविक करत असताना महादेव वीर शाळेमधील जुन्या आठवणी ताज्या केल्या शाळा शिकत असताना जुनी कुडाची शाळा त्यातील जमीन सेनानी सारवण काढणे याबाबतच्या आठवणी ताज्या केल्या तसेच शेवाळे सरांचा मार याबाबत ही आठवणी सांगितल्या कार्यक्रमाचे सर्व शिक्षकांनी एक अनमोल असा सल्ला दिला प्रत्येकाने आपापल्या जीवनातील काही थोडा वेळ काढून प्रत्येकानी सुखदुःखात सामील राहावे असा मुलाचा सल्ला दिला कुलकर्णी सर यांनी यानिमित्त बोलत असताना शाळा स्थापनेपासून आजपर्यंतच्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा एक ग्रुप तयार करून एक मोठ्या शैक्षणिक संमेलन घ्यावे जेणेकरून त्या स्नेहसंमेलनातून शाळेसाठी भरीव अशी मदत करता येईल असा एक अनमोल सल्ला त्यांनी दिला आभार कार्यक्रमाचे आभार मानत असताना वेगवेगळ्या ठिकाणावरून मुले मुली यांनी वेळात वेळ काढून हा कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल आयोजकाकडून सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.