मेढा,(अजित जगताप) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचा सन्मान नेहमीच करतात पण अलीकडच्या काळात ठेकेदारांनीच निवडणूक प्रचार यंत्रणा का राबवली? याचा तपशील मतदारांच्या मनात आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीच्या मशाल चिन्हावर बटन या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची वेळ मतदारांवर आली असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय धनावडे यांनी दिली. ठेकेदारांचा विकास का गावचा विकास याचा आता निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचे मत ही त्यांनी व्यक्त केले. मेढा ता. जावळी येथे झालेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्याचे स्वप्न स्वर्गीय आदरणीय श्रीमंत अभयसिंहराजे भोसले व स्वर्गीय जी.जी. कदम, भिकू दाजी भिलारे व लालसिंगराव शिंदे, बाबासाहेब आकडकर कृष्णराव तरडे यांच्या विचारांचा वारसा जतन करत २८ वर्षांपूर्वी शिवसेनेचे माजी आमदार सदाशिव सकपाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी जावळीत विकासाची गंगा सुरू केली. परंतु त्यांनी कधीही प्रचारासाठी ठेकेदारांची फोर्स उभी केली नव्हती. त्यामुळे उत्कृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांचा गाव पातळीवर गौरव केला जात होता. त्यांना राजकारणापासून अलिप्त ठेवले जात होते. आता ठेकेदारांशिवाय लोकप्रतिनिधीचे पान हालत नाही. ते कमी पडत आहे की काय म्हणून आता जावळीतील बंटी- बबली सुद्धा मैदानात येऊन प्रचार करू लागलेले आहेत. यातच महाविकास आघाडीचा नैतिक विजय आहे. असे सचिन भोसले यांनी सांगितले.
जावळीकरांनी अनेक सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम केले तसेच ह.भ.प. दत्तात्रय महाराज कळंबे यांच्या नेतृत्वाखाली गावोगावी पारायण कीर्तन भजन होत होते. आता निवडणुक प्रचाराचा वसंत फुलू लागल्यामुळे काहींसाठी ती पर्वणी ठरू लागलेली आहे. खालच्या पातळीवर भाषण बाजी करून खंबा ,चकणा, सोडा असे वाक्य तरुण पिढीला मार्गदर्शक ठरतात की त्यांना व्यसनी बनवतात? याचा आता संबंधित लोकप्रतिनिधींना विचार करणे गरजेचे आहे.
निवडणुका या राजकीय पक्षांनी दिलेल्या जाहीरनामाच्या अनुषंगाने भाषणबाजी केली जाते .एक उत्कृष्ट आचारसंहिता म्हणून त्याकडे पाहिले जाते. आता सातारा- जावळीतील परिस्थिती बदलली असून लोक कोणतेही भूल छापायला बळी पडत नाही. याचे मनापासून सातारा जावळीतील स्वाभिमानी मतदारांना समाधान वाटत आहे.
सध्या संपूर्ण सातारा जावळी तालुक्यामध्ये परिवर्तनाचे वारे वाहत आहेत .२०१४ साली जावळीचे सुपुत्र शिवसेनेचे माजी आमदार दगडू सपकाळ यांना २५ हजार ४२१ मत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवारांना ९७ हजार१६४ मतं पडली होती. याव्यतिरिक्त मनसे, बहुजन समाज पक्षालाही मत मिळाली होती. आता राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र आल्यामुळे मताची नक्कीच टक्केवारी वाढणार आहे.
२०१९ साली मतांची विभागणी होऊन सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ७४,५८१ मते मिळाली होती. या ठिकाणी ४३,४२४ मताधिक्याने भाजपचा उमेदवार विजयी झाले होते. परंतु या विजयाचे खरे शिल्पकार सामान्य कार्यकर्ते होते. आता असे कार्यकर्ते सध्या महाविकास आघाडीच्या मशाल चिन्हाचा प्रचार करून अधिकृत उमेदवार श्री अमित कदम यांना निवडून आणण्यासाठी नैतिकदृष्ट्या प्रचार करत आहेत.
आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आदरणीय राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार, राष्ट्रीय काँग्रेसचे नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण यांना मानणारा मतदार चांगल्या उमेदवाराच्या प्रतीक्षेत होता. ही प्रतीक्षा संपलेली आहे.
सातारा जावळी मतदारसंघात बंद पडलेले उद्योग रोजगारीचा अभाव सत्तांतून संपत्ती संपत्तीतून पुन्हा सत्ता आणि ठेकेदारांचे हित हे दृष्टचक्र भेटण्यासाठीच मतदारांनीच मशाल हाती घेतलेली आहे. भ्रष्टाचाराचा भस्मासुर पण करण्यासाठी आता प्रत्येकानेच हाती मशाल घेणे गरजेचे आहे. नुसत्या निकृष्ट दर्जाच्या कामावर पाच वर्षे टिका-टिपणी करण्यापेक्षा एक वेळेस मशाल निवडून द्या. असे यावेळी आवाहन करण्यात आले.
या मेळाव्याला राजेंद्र पाटील, सागर निकम, निलेश शिर्के, रमेश धनावडे, सतीश जाधव, समीर पठाण, इकबाल शेख व महिला वर्ग उपस्थित होते.
——&———————————-
फोटो- प्रचारा निमित्त सातारा जावळी मध्ये सामान्य कार्यकर्ते भेट घेऊ लागले
गावचा की ठेकेदारांचा विकास याचा निर्णय सातारा जावळीकरांनी घ्यावा –दत्तात्रय धनावडे
RELATED ARTICLES