मुंबई : अखिल रुक्मिणी नगर उत्कर्ष संघ व भटकी भूत बोरिवली मुंबई या दोन्ही सामाजिक संस्थेच्या वतीने नुकतेच जिल्हा परिषद कोतीमाळ तालुका जव्हार जिल्हा पालघर या शाळेमध्ये शालेय विद्यार्थ्यांबरोबर मायेची दिवाळी साजरी करण्यात आली. संस्थेच्या वतीने शाळेतील 60 विद्यार्थ्यांकरिता कंपास बॉक्स, पॅड, चित्रकलेच्या वह्या, एकेरी, दुरेघी, व चौरेघी वह्या, पेन, पट्ट्या, दिवाळीचा फराळ, फटाके, विद्यार्थ्यांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी चादर यांचे वितरण करण्यात आले. श्री राजाराम गीते यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तसेच कार्यक्रमास उपस्थित असलेले सर्व देणगीदार ज्यांनी कार्यक्रमास देणगी दिली अशा सर्व देणगीदारांचे आभार व्यक्त केले आले. या प्रसंगी जिल्हा परिषद शाळा कोतीमाळ शाळेचे मुख्याध्यापक रामू दिवा, पत्रकार व समाजसेवक मनोज कामडी तसेच प्रमुख पाहुणे कुमारी अश्विनी गोसावी , श्री राजेंद्र परब, श्री सुनील डफळे सामाजिक संस्थेचे पदाधिकारी राकेश मोरे, राजू धुवाळी सुरज म्हात्रे , सुशांत कदम, योगेश सावंत, योगेश चव्हाण, तेजस यादव, अमित बापर्डेकर ,मयूर अध्यारू, हर्षद धुवाळी, अमोल तिरलोटकर, चंद्रास तिरलोटकर , अमित चव्हाण, स्मिता यादव, पल्लवी बापर्डेकर, दर्शन तिरलोटकर उपस्थित होते. आभार प्रदर्शन श्री राजू धुवाळी यांनी केले.
मायेची दिवाळी ; सामाजिक बांधिलकी जपण्याचा एक आगळा वेगळा प्रयत्न ! .
RELATED ARTICLES