कराड : नांदगाव ता.कराड येथे कै.सौ.द्वारकाबाई सुकरे प्रतिष्ठान व मातोश्री सिंधुताई सुकरे स्मृतीमंच यांच्या वतीने यंदा सलग तिसऱ्या वर्षी भव्य किल्ला बनवा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात १०० वर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे.शनिवारी सकाळी या स्पर्धेच्या परिक्षणाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन व श्रीफळ वाढवून प्रारंभ करण्यात आला. यावेळी स्पर्धेचे संयोजक,परिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.