प्रतिनीधी : जीवन ज्योती आशालय, नेरुळ,सेक्टर १६ ए नवी मुंबई. येथील अनाथ मुलांसोबत नवी मुंबईतील तरुण तडफदार युवा उद्योजक करण नायडू यांनी आपल्या मित्र परिवारासह दिवाळी साजरी केली. येते लहान मुलांना नवीन कपडे आणि खाऊ वाटप केले. करण नायडू यांना सामाजिक सेवा करण्याची आवड असल्याने ते नेहमीच नवी मुंबई येथील सानपाडा येथील अनाथाश्रम,कोपरखैरणे परिसरात असलेले आधार वृध्दाश्रम,आदिवासी पाडा,पनवेल येथील कुष्ठरोगी यांचे वृध्दाश्रम अशा विविध ठिकाणी सामाजिक बांधिलकी जोपासत आपली समाजसेवा करत असतात.त्यांच्या कार्याबद्दल त्यांना त्यांचा मित्र परिवार सतत प्रोत्साहन देत असतो.त्यामुळे युवा उद्योजक करण नायडू हे सामाजिक कार्य पार पाडत असल्याचे ते सांगतात. दिवाळी निमित्त त्यांनी नेरूळ येथील जीवन ज्योती आशालय येथे अनाथ मुलांना दिवाळी फराळ,इतर खाऊ तसेच त्या सर्व मुलांना नवनवीन कपडे देऊन त्यांच्यासोबत त्यांनी दिवाळी उत्साहात साजरी केली.यावेळी त्यांच्यासोबत ललित नाईकर, हरिदास सागरे, अनिकेत राठोड, राहुल सावंत, दीपक निवांन,तनुश येथील नैरा आदी मित्र परिवार उपस्थित होता.
