Wednesday, August 6, 2025
घरमहाराष्ट्रमुंबईत सायन कोळीवाडा परिसरातील काँग्रेसचे वरिष्ठ माजी विरोधी पक्ष नेते पाच वेळचे...

मुंबईत सायन कोळीवाडा परिसरातील काँग्रेसचे वरिष्ठ माजी विरोधी पक्ष नेते पाच वेळचे माजी नगरसेवक रवी राजा यांचा भाजपामध्ये प्रवेश…

मुंबई  : मुंबईच्या सायन कोळीवाडा परिसरातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि पाच वेळचे माजी नगरसेवक रवी राजा यांनी काँग्रेस पक्षाला रामराम करून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे येणाऱ्या काळामध्ये आणखी वरिष्ठ काँग्रेसचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते हे भाजपामध्ये प्रवेश करतील अशी माहिती यावेळी यांच्यामार्फत देण्यात आली.

आज झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये माजी विरोधी पक्ष नेता पाच वेळचे माजी नगरसेवक रवी राजा हे यांनी काँग्रेस पक्षाला रामराम करून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर मुंबईतील एक मोठी ही जबाबदारी देण्यात आली रवी राजा हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहे-

मुंबईतील सायन-कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी उत्सुक होते. मात्र, पक्षाने त्यांची दखल न घेतल्याने रवी राजा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांच्याकडे संघटनेच्या उपाध्यक्षपदाची सूत्रे दिली आहेत. रवी राजा यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्ष सोडण्यामागील आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी रवी राजा यांची एक कृती चर्चेचा विषय ठरली.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, अतिशय आनंदाची गोष्ट आहे की रवी राजा आमच्यासोबत येत आहेत. एक आक्रमक भूमिका मांडणारा नेता ज्यांनी पाच टर्म त्यांनी नगरसेवक म्हणून काम केले आहे. मोठा जनसंपर्क आहे. भाजपला त्यांच्या अनुभवाचा फायदा मिळणार आहे. पुढच्या आठवड्यात काँग्रेस मधील आणखी काही प्रवेश भाजपमध्ये होतील. येत्या काळात आणखीनही लोक भाजपात येणार आहेत, वेळ आली की त्यांची नावं जाहीर होतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments