Wednesday, August 6, 2025
घरमहाराष्ट्रबृहन्मुंबई महानगर पालिका जी उत्तर विभाग घ.क.व्य.खातेदीपावली स्नेह संमेलन! मोठ्या उत्साही वातावरणात...

बृहन्मुंबई महानगर पालिका जी उत्तर विभाग घ.क.व्य.खातेदीपावली स्नेह संमेलन! मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न!

प्रतिनीधी : सालाबादप्रमाणे याही वर्षी बुधवार ३० सप्टेंबर २०२४  रोजी उत्तर विभागातील घ.क.व्य खात्यातील पर्यवेक्षकीय कर्मचारी अधिकारी यांचा जी उत्तर विभाग या ठिकाणी दीपावली स्नेह संमेलन मोठ्या आनंदी आणि उत्साही वातावरणात संपन्न झाले.
सततच्या कामाच्या तणावातून मोकळीक काढून दीपावली सणाचा आतुरतेने वाट पाहणारा पर्यवेक्षकिय कर्मचारी याही वर्षी दीपावली उत्सवाचा वाट पाहत होता.
भराभर वर्गणी काढून कार्यक्रमाचे नियोजन करून प्रत्येकावर कामाची जबाबदारी सोपवून कार्यक्रमाची रूपरेषा आखली गेली.
प्रत्येकाने नेटाने काम करून आज दीपावली स्नेह सम्मेलन खऱ्या अर्थाने घडवून आणले. पर्यवेक्षकीय कर्मचारी यांनी आज सकाळीं सर्वं सेक्शन मधील आपापली कामे आटपून जी उत्तर विभागाकडे सर्वांची पाऊले आपसूकच वळू लागली,
पूर्वनियोजित ठरल्याप्रमाणे सकाळीच १२.०० वाजता पूजा पाठ करताना समुप श्री हेमंत घाटगे व श्री पर्यवेक्षक श्री रत्नकांत सावंत श्री संतोष तायडे,श्री राजेश भावसार,श्री संतोष वावेकर यांनी दीप्र्ज्वालित केले तर किरण पाटील यांनी अगरबत्ती लाऊन कार्यालय सुंगधित करून वातावरण मंगलमय केले.त्यामुळे कर्यालयातील वातावरण प्रसन्न झाले होते.
या मंगलमय वातावरणात पर्यवेक्षक श्री आचरेकर यांचे ऐतिहासिक पेहरावात आगमन होताच तुतारी वाजवून स्वागत केले गेले अन् याच मंगलमय वातावरणाचा फायदा घेऊन श्री आचरेकर यांनी श्री गणेशास गाऱ्हाणे घालून सर्वं कर्मचाऱ्यांची रखावाली करण्याची श्री गणेशास साकडे घातले.
तदनंतर कार्यक्रमाच्या आयोजिका श्रीमती सिध्दी टिबे यांनी मिठाई वाटून सर्वांचे तोंड गोड केले.
तदनंतर उपस्थितांनी दीपावलीच्या शुभेच्छापर भाषण केली.व एकमेकांस दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
या भाषणांच्या कार्यक्रमानंतर karaoke सिंगर श्री प्रशांत सावखंडे,श्री संदेश मटकर,लिपिक श्री गोडे यांनी गीते गाऊन उपस्थितांचे मनोरंजन केले.
मनोरंजन कार्यक्रमानंतर सर्वांनी एकत्र मिळून स्नेहभोजनचा मनमुराद आस्वाद घेतला.
तदनंतर संगीत व गाण्याच्या ठेक्यावर अनेक प्रकारच्या गाण्यावर सामुदायिक नृत्य करण्यात आली.
या नृत्यामध्ये सर्वांनी भाग घेऊन खऱ्या अर्थाने सर्वांचे मनोमिलन होऊन जी उत्तरचे दीपावली स्नेह संमेलन घडून आले असे म्हणता येईल!
कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात आयोजकांनी दीपावली भेट वस्तू सर्वांना वाटप करून एकमेकांचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती सहायक अभियंता श्री गीते सर श्री भोईर सर,दुय्यम अभियंता श्री गढरी,श्री राठोड सर आणि थोटे सर तसेच प्रशासकीय अधिकारी श्री साबळे सर यांची लाभली होती.
आयोजकांनी कार्यक्रमाचे उत्तम प्रकारे नियोजन आणि आयोजन केले होते तद्वतच कार्यक्रम सुरेख आणि सुंदररित्या संपन्न झाला .त्या बद्दल आयोजक व नियोजन कर्त्यांचे मनस्वी आभार मानण्यात आले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments