प्रतिनीधी : विधानसभेचे बिगुल वाजल्यानंतर प्रत्येक राजकीय पक्षांमध्ये उमेदवारी मिळावी म्हणून रस्सीखेच सुरू होती.त्यामध्ये महविकस आघाडी मध्ये तिकीट वाटपावरून सतत वाद होत होते.काँग्रेस पार्टीने काही ठिकाणी आपले उमेदवार उभे केल्यामुळे आघाडी मध्ये बिघाडी निर्माण झाली.शिवसेना पक्षाने देखील आपल्या सबंधित उमेदवार यांना बोलावून ए बी फार्म दिले आणि काँग्रेसला प्रतिउत्तर देऊन आपले उमेदवार त्यांच्या विरोधात उभे केले आहेत.अशाच प्रकारे धारावी विधानसभा क्षेत्राची निवडणूक काँग्रेस विरोधात लढवून आणि ती काबीज करून पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे उभाठा यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे माजी आमदार आणि विद्यमान उमेदवार बाबुराव माने यांनी लढा देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठीच्या निर्णयानंतर धारावी बचाव आंदोलन याचे प्रमुख नेते म्हणून बाबुराव माने- यांनी केला परंतु महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या उमेदवार ज्योती गायकवाड यांनी खासदार वर्षा गायकवाड आणि कार्यकर्त्यांसोबत त्यांनीही उमेदवारी अर्ज काल दाखल केला होता. यामुळे धारावीतील असंख्य काँग्रेस कार्यकर्तेही नाराज असल्याचे सूत्रांकडून माहिती समोर येत होती.

धारावी बचाव आंदोलन आणि स्थानिक धारावीतील ज्येष्ठ शिवसैनिक माजी आमदार बाबुराव माने राज्यात आणि मुंबई धारावीत प्रसिद्ध आहेत सर्वांना एकत्र घेऊन काम करण्याची क्षमता या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये आहे धारावी विकासाचे राजकारण होऊन धारावीचा विकास रखडला जाणार याकरता शिवसेना(उबाठा) गटाचे बाबुराव माने यांनी धारावीचा विकास पूर्ण करणार आणि प्रत्येकाला पाचशे स्क्वेअर फुटाचे घर मिळून देणार अशी घोषणा देत यावेळी लक्ष्मी बाग येथील शिवसेना शाखेपासून भव्य रॅली काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अशोक स्तंभाला फुले अर्पण करून अभिवादन केले. कार्यकर्त्यांच्या रॅली यांचा मोर्चा निवडणूक कार्यालयाकडे येऊन पोहोचला निवडणूक अधिकाऱ्याकडे शिवसेनेच्या सैनिकांबरोबर मोठ्या संख्येने माजी नगरसेवक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार म्हणून बाबुराव माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी ते म्हणाले की ,ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हायला.. शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे,शिवसेना पक्षा प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या सर्वांच्या आशिर्वादाने, सहकार्याने आणि साक्षीने मी..बाबुराव माने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मशाल चिन्ह निवडणूक लढणार आहे , आपल्या धारावी विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी मा.नगरसेवक, शाखाप्रमुख व सर्व शिवसेनेचे युवासेनेचे पदाधिकारी सर्व महिला, पुरुष उपशाखा प्रमुख,गटप्रमुख,युवासेना,आजी माजी शिवसैनिक उपस्थित होते.