मुंबई (शांताराम गुडेकर ) : शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा तर्फे अंधेरी येथील निष्ठावंत शिवसैनिक कै.अनिल डिंगणकर यांच्या पत्नी अस्मिता अनिल डिंगणकर यांना दिवाळीचे औचित्य साधून जीवनावशक वस्तू देण्यात आल्या.यावेळी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे )प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्थापक अध्यक्ष यशवंत विठ्ठल खोपकर,सचिव संदीप चादीवडे,संचालक दौलत बेल्हेकर,कार्यालय प्रमुख वसंत घडशी,मेघा सावंत, वनिता वायकर, राजेंद्र पेडणेकर, विश्वास तेली,सुनिता घाडगे (म. शाखासंघटक उबाठा), विष्णु मोरे (कार्यालय प्रमुख),उदय यादव(उपशाखाप्रमुख), दुर्गेश घाग (उपशाखाप्रमुख),हेमंत कारेकर (गटप्रमुख-अंधेरी पश्चिम -अबवली शाखा क्रमांक -६४)आदी मान्यवर उपस्थित होते.
