Tuesday, September 9, 2025
घरमहाराष्ट्रअग्निशमन यंत्रणेनेबाबत अजूनही अनेक शाळा महाविद्यालयात मनमानी कारभार

अग्निशमन यंत्रणेनेबाबत अजूनही अनेक शाळा महाविद्यालयात मनमानी कारभार

मुंबई : शाळा महाविद्यालय मधील अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत नसल्याने तामिळनाडू येथे ९४ विद्यार्थी मृत्युमुखी पडले होते. त्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने आग प्रतिबंध कायदा कठोर केला होता. प्रत्येक राज्याने त्याची अंमलबजावणी सुरू करा असे आदेश दिले होते. मात्र अजूनही अनेक शाळा महाविद्यालये मनमानी करत कायदा पाळत नाहीत. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी भीम आर्मी चे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांनी सरकारकडे केली आहे.

मुंबईतील वाळकेश्वर येथील गोपी बिर्ला मेमोरियल शाळेमध्ये अग्नी सुरक्षा यंत्राची अद्ययावत स्थिती नसल्याने मोठा वाद झाला होता. अग्निशामक विभागातील काही अधिकारी व शाळा मधील काही अधिकारी मनमानी कारभार करत मुलांच्या जीवाशी खेळत आहेत असा आरोप अशोक कांबळे यांनी केला आहे.

ही शाळा यश बिर्ला समूहाद्वारे चालवली जाते. शाळा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा बंगला मध्ये आहे. विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात घालुन अग्नी सुरक्षा नियमाचे उल्लंघन करून मनमानी करण्याचा यांना अधिकार कोणी दिला ? असा सवाल अशोक कांबळे यांनी केला आहे.

खाजगी अग्निशमन सुरक्षा यंत्रे पुरविणाऱ्या कंत्राटदाराला जबाबदार धरणे म्हणजे शाळेने जबाबदारी झटकण्याचा प्रकार आहे. शाळेची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात यावी आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून या समिती भीम आर्मी संघटनेचा विभागीय प्रतिनिधी घेण्यात यावा अशी मागणी अशोक कांबळे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments