Wednesday, September 10, 2025
घरमहाराष्ट्रकोरेगावच्या वाहतूक समस्याने दोन जिल्ह्यातील वाहन चालक बेजार…..

कोरेगावच्या वाहतूक समस्याने दोन जिल्ह्यातील वाहन चालक बेजार…..



कोरेगाव(अजित जगताप) : सध्या विकासाच्या गप्पा सर्वजण मारत आहेत. पण ज्यांना सातारा जिल्ह्यातील साधा कोरेगाव ते कुमठे फाटा या दोन किलोमीटरच्या रस्त्याची डागडुजी व अतिक्रमण काढता येत नाही . त्यामुळे हा रस्ता सातारा व सोलापूर जिल्ह्यातील असंख्य वाहन चालकांना बेजार करणारा ठरलेला आहे.
लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर भूलथापा देवुन मतदान पदरात पाडून घेण्याची चढाओढ लागली आहे. कोरगावकरांना ये जा करण्यासाठी या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याची मागणी पुढे आलेली आहे.
सातारा- पंढरपूर महामार्गावरील सातारा जिल्ह्यातील महत्त्वाचे ठिकाण म्हणजे कोरेगावची बाजारपेठ आहे. या रस्त्यावर दर पंधरा मिनिटाला वाहतूक अडथळा निर्माण होत आहे. एक साधी मोटर सायकल रस्त्यावर उभी केली तर वीस ते अर्धा वीस मिनिटे ते अर्धा तास वाहतूक खोळंबली जाते. उमेदवारी अर्ज दाखल करताना वाहन अडथळा होणे क्रमप्राप्त झाला आहे.
या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आणि काही धन दांडगे व्यापाऱ्यांचे बंगले व धार्मिक स्थळाचे प्रवेशद्वार उभे केल्याने अडथळ्यामध्ये भर पडली आहे. काही फेरीवाल्यांनी स्वतःचे साहित्य व फलक उभे करून कोरेगाव शहराचे विद्रोपीकरण केलेले आहे.
कोरेगाव नगरपंचायत असून सुद्धा या वाहतूक समस्या मिटवण्यासाठी कुणालाही वेळ नाही. फक्त कोरेगाव शहराचा वापर हा बॅनरबाजी- पोस्टरबाजी व एकमेकांची उणी धुणे काढण्यासाठी केला जात आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत कोरेगावची वाहतूक समस्या दुर्लक्षित करण्यासारखी झालेली नाही. त्यामुळे काही नागरिकांनी या समस्येकडे लक्ष देण्यासाठी उमेदवार पसंत नाही हे दर्शवणाऱ्या नोटा पसंद केला आहे. कोरेगावकरांना वाहतूक समस्या दूर करण्यासाठी आता नोटाचा आधार घ्यावा लागत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. दरम्यान, कोरेगाव तालुक्याचे ठिकाण असूनही या ठिकाणी शौचालय व बस स्थानक यांचा अभाव असल्याने कोरेगावचा विकास कोरा ठेवण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे. हेच वाटेकरी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात विकास काम केल्याचे दाखवून आपापली बिदागी वसुल करीत आहेत.अनेक नामांकित व्यावसायिक पुढारी कोरेगावातील प्रत्येक गल्लीमध्ये आहेत . सकाळी प्रभात फेरी मारणारे या रस्त्या ऐवजी इतर ठिकाणी मॉर्निंग वॉक व शतपावलीसाठी जात आहेत. साखर कारखान्याच्या गाळपाला सुरुवात झाल्यानंतर या रस्त्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व ट्रकमुळे कोरेगावात नको रे बाबा.. असे म्हणण्याची वेळ अनेक वाहन चालकांवर आली असल्याची माहिती ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी दिली आहे. ऊस वाहतूक करणाऱ्यांना पर्यायी मार्ग दिले असले तरी ते त्याचा वापर करत नसल्याने वाहतुकीला अनेक अडचण झालेली आहे.


RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments