सातारा(अजित जगताप) : सातारा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या समर्थ गावाने माझी वसुंधरा योजनेचा सहभाग घेतला. त्याच्याच भाग म्हणून गावात फटाके मुक्त अभिनव उपक्रम राबवल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे .
याबाबत समर्थगाव ग्रामपंचायत ने स्वातंत्र्यदिनी दि: १५ ऑगस्ट रोजी ठराव क्रमांक सात नुसार फटाके बंदी ठराव केलेले आहे. या उपक्रमासाठी सरपंच हिराबाई धारेराव, उपसरपंच रघुनाथ कदम व ग्रामसेविका जयश्री साळुंखे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट जिल्हा सरचिटणीस वैशाली जाधव व ग्रामस्थांनी यामध्ये सहभाग घेतला आहे.
गेले पंचवीस वर्षापासून समर्थक गाव ग्रामपंचायत असून या गावची लोकसंख्या सुमारे साडेचारशे असून गावातील ग्रामस्थ हे वैचारिक भूमिका घेऊन गावच्या विकासासाठी एकत्र येतात. आज माझी वसुंधरा योजनेमध्ये गावचा नावलौकिक व्हावा. यासाठी वृक्षारोपण सार्वजनिक स्वच्छता व प्लास्टिकचा वापर टाळणे. पर्यावरणाचा ऱ्हास टाळणे व नव्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणलेल्या बांबू लागवड योजनेमध्ये सहभाग घेतलेला आहे. शेतकरी ग्रामस्थ त्याला उदंड प्रतिसाद देत आहेत.
सार्वजनिक जागेमध्ये प्रदूषण करणाऱ्या अनेक गोष्टींवर ती निर्बंध लावण्यात आलेले आहेत. फटाके मुक्त कार्यक्रमामुळे ग्रामस्थांनी आनंदी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
सध्या फटाक्यांमुळे मानवी अनेक अपघात झालेले आहेत. परंतु, त्यापेक्षा मुख्य प्राणी, पशुपक्षी यांना सुद्धा फटाक्याच्या दूर व आवाजामुळे खूप मोठ्या वेदनात सहन कराव्या लागतात. यावर निर्बंध घालण्यासाठी फटाके मुक्त व ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी जनजागृती केली जात आहे. फटाके वाजवल्यामुळे आनंद मिळतो. हा गैरसमज असून या फटाक्याच्या आवाजाने ज्येष्ठ नागरिक, आजारी रुग्ण व पाळीव जनावरे खूप मोठा अन्याय होत असतो. याची आता ग्रामस्थांना जाणीव झालेली आहे. त्यामुळे फटाके मुक्त दिवाळी साजरी करणारे हे गाव महाराष्ट्रातील बहुदा पहिले गाव ठरले आहे. सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा योजनेमध्ये उत्कृष्ट काम केले आहे.
