Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रसंविधान बदलू देणार नाही - उल्का महाजन (सामाजिक कार्यकर्त्या)

संविधान बदलू देणार नाही – उल्का महाजन (सामाजिक कार्यकर्त्या)

प्रतिनिधी(रमेश औताडे) : सध्या जे देशभरात मनमानी राजकारण सुरू आहे ते पाहता संविधान बदलण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे सामान्य माणसाला भविष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागणार आहे.भाजपला ४०० पेक्षा जास्त जागांवर निवडून द्या कारण संविधान बदलायचे आहे अशी भूमिका काही नेत्यांनी जाहीर भूमिका मांडली आहे. भाजपच्या कुठल्याच नेत्याने या जाहीर वक्तव्याचा साधा निषेध पण केला नाही. या पार्श्वभूमीवर आमची ” भारत जोडो अभियान ” ही चळवळ जनजागृती करणार असून संविधान बदलू देणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत अशी भूमिका भारत जोडो अभियानाच्या वतीने अभियानाच्या निमंत्रक उल्का महाजन यांनी बुधवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत मांडली.

देशात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या असून पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी आणि शेवटचा टप्पा २० मे रोजी पार पडणार आहे. भारतीय जनता पार्टी हि लोकशाही विरोधी, संविधान विरोधी असुन त्यांच्या राजवटीला लोक वैतागले असल्याने संविधान आणि लोकशाही वाचवायची लढाई देशातील तमाम विरोधी पक्ष आणि सामाजिक संघटना एकत्र येऊन लढत आहेत असे संजय मंगला गोपाळ यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्रातही सर्व ४८ मतदारसंघांत अभियानाचे कार्यकर्ते पसरलेले असून २३ मतदारसंघात पूर्ण फोकस ठेवून काम करत आहेत. भारत जोडो अभियान हे जाणून आहे की या निवडणुकीत ५४३ पैकी एक एक मतदारसंघ महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रात तब्बल ४८ मतदारसंघ आहेत आणि उत्तर प्रदेश इथल्या ८० मतदारसंघांच्या नंतर महाराष्ट्र हे दुसरे मोठे राज्य आहे. अश्या स्थितीत येत्या निवडणुकीत भारत जोडो अभियान राज्यातल्या प्रत्येक मतदारसंघात एक स्पष्ट भूमिका घेऊन कामाला लागले आहे.असे सीताराम शेलार यांनी सांगितले.

गेल्या वर्षी जुलै १ आणि २ तारखेला जळगाव इथे महाराष्ट्रातल्या सुमारे हजाराहून अधिक समविचारी सहकाऱ्यांचे राज्यस्तरीय संमेलन सुरू झाले आणि ही प्रक्रिया त्यानंतर अथकपणे सुरू आहे. मधल्या काळात राज्यातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात समविचारी व्यक्ती, संस्था शोधणे इथपासून ते जनमानसाचा कानोसा घेऊन भाजप व महायुतीतील उमेदवारांचा पाडाव करण्यासाठी जनचळवळीची कार्यप्रणाली सुरू झाली आहे.

अनेक संघटना ज्या भारत जोडो अभियानाच्या भाग नव्हत्या त्यांच्याशी चर्चा करून ‘निर्धार महाराष्ट्राचा’ ही मुख्य प्रक्रिया उभी केली गेली आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, प्रकाश आंबेडकर यांचा वंचित, शेतकरी कामगार पक्ष आणि समाजवादी पक्ष या समविचारी पक्षांच्या नेत्यांना भेटून निवडणूक पूर्व आघाडीसाठी विनंती केली आणि सोबतच त्यांना महाराष्ट्रात सुरू असलेल्या आमच्या कामाची माहिती पण दिली आहे असे निमंत्रक शीराज यांनी सांगितले

मोदी सरकारची धोरणे ही शेतकरी कष्टकरी मजूर- छोटे उद्योजक – तरुण – दलित आणि अल्पसंख्यांक यांच्या विरोधातली आहेत हे मागील १० वर्षात स्पष्ट झालेले आहे. मुठभर भांडवलदार आणि धर्माध संघटना यांच्या साठीच मोदी सरकार काम करते हेही लपून राहिलेले नाही. अश्या वेळी, पुन्हा एकदा जनतेचे सरकार आणायचे आणि देश हा रसातळाला जाण्यापासून वाचवायचा हा हेतू घेऊन आम्ही या निवडणुकीत जनजागृती करण्यासाठी सक्रिय झालो आहोत. आता ही लढाई भाजप विरुद्ध भारताचे लोक अशी आहे.असे सीताराम शेलार यांनी सांगितले.

.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments