Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रमहायुतीने जागा वाटप करताना उमेदवार नाकारल्याने आठवले गटाचा एल्गार

महायुतीने जागा वाटप करताना उमेदवार नाकारल्याने आठवले गटाचा एल्गार

मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाची भाजपा सोबत विधानसभा निवडणूकीत युती असूनही उमेदवारी वाटप संदर्भात सन्मानपूर्वक वाटाघाटी पूर्ण न झाल्याने गुरुवारी मुंबईत पक्षाच्या कार्यालयासमोर पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून निषेध एल्गार व्यक्त करण्यात आला.

भारतीय जनता पक्षाने शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांच्याशी तिकीट वाटपाच्या सन्मानपूर्वक वाटाघाटी केल्या. परंतु रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांना विश्वासात घेतले नाही. रिपाई पक्षाला सन्मानपूर्वक जागा मुंबई व महाराष्ट्रात सोडलेल्या नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे.

मुंबई प्रदेश कार्यकारणीतील व सर्व जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष, वार्ड अध्यक्ष, युवक आधाडी, महिला आघाडी व विविध आघाडी यांनी संघर्ष नायक राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रामदास आठवले यांचे आदेश आल्याशिवाय महायुतीची सन्मानजनक जागा वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर व मुंबई प्रदेशचा आदेश आपणांस पारीत झाल्यानंतरच आपण आपल्या मतदार सघात निवडणूकीच्या कामास लागावे, असा आदेश देण्यात येत असल्याची माहिती मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे यांनी दिली.

सरचिटणीस मुंबई प्रदेश विवेक गोविंद पवार, मुंबई प्रदेश युवा अध्यक्ष साचीनभाई मोहिते, महाराष्ट्र युवा अध्यक्ष पप्पू कागदे , दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष सोना कांबळे, दक्षिण मुंबई जिल्हा सरचिटणीस शिरीष चिखलकर आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments