मुंबई (शांताराम गुडेकर /दिपक कारकर ) वसंत सबनीस लिखित"सौजन्याची ऐशीतैशी"दोन अंकी धमाल विनोदी नाटक, पुनरुज्जीवित व्यावसायिक नाटक रंगभूमीवर येत असून या नाटकाची निर्मिती आणि दिग्दर्शन प्रदिप सुलभा अरविंद गोगटे यांनी केली आहे.शुभारंभाचा प्रयोग क्र.२ दिवाळीत होणार असून हास्याचे फटाके श्री शिवाजी मंदिर,दादर पश्चिम येथे शनिवार, २ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्रौ ८-३० वा. फुटणार आहेत.कलाकार येत आहेत संपूर्ण महाराष्ट्राला हसवायला..! पुन्हा एकदा चाळीतली धमाल पाहण्यासाठी दोन अंकी विनोदी नाटक वसंत सबनीस लिखित अजरामर कलाकृती ‘‘सौजन्न्याची ऐशीतैशी’’ हे नाटक रंगभूमीवर पुन्हा एकदा आले आहे.. या नाटकाचे निर्मिती आणि दिग्दर्शन दिवंगत अभिनेते प्रदिप पटवर्धन यांचे भाचे प्रदिप गोगटे करीत असून सह-दिग्दर्शन यज्ञेश दौंड यांनी केले आहे. उत्कर्ष निर्मित, कल्लाकार्स प्रस्तुत, व्ही आर प्रॉडक्शन प्रकाशित या नाटकाचे संपूर्ण महाराष्ट्रात अनेक प्रयोग करून रसिकांना १०० टक्के मनोरंजन देण्याचा प्रदिप गोगटे यांचा मानस आहे.या नाटकाचे निर्मिती सूत्रधार अनुदीप जाधव असून संगीत मंदार पाटील,गीतकार यज्ञेश दौंड, गायक नागेश मोरवेकर, प्रकाशयोजना प्रतिक मोहीते, नेपथ्य नांदलस्कर, नेपथ्य निर्मिती उल्हास सुर्वे, वेशभूषा आणि निर्मिती व्यवस्थापक जान्हवी अस्लेकर, रंगभूषा सचिन जाधव, फोटोग्राफी विजय बारसे, डिजिटल मार्केटींग साक्षी गाडे, पोस्टर डिझाईन शामल-अविनाश, नृत्य प्रकाश राणे, संगीत संयोजक अजय बो-हाडे, रंगमंच व्यवस्था नियती घोडके, विक्रांत घायतडके, कपडेपट संजय जाधव, पोस्टर डिझाईन सपोर्ट माधुरी गोगटे, विशेष सहकार्य गोट्या सावंत, सुरेश भोसले यांचे असून यात सचिन नवरे, अपेक्षा रानडे, हेमंत बडेकर, प्राची केळुसकर, मयांक सरदेशमुख, अश्विनी तेंडूलकर, योगेश खांबल, नील सोनावणे, उमा शिंदे, ओमकार गावडे, रोहन कदम आणि प्रदिप गोगटे हे कलावंत भूमिका करत आहेत. हे नाटक पुन्हा एकदा व्यावसायिक रंगभूमीवर आले असून तोच काळ आणि तीच चाळ जपण्याचा पूर्ण प्रयत्न सर्व कलाकारांनी केला आहे. या नाटकाचे सुंदर गाणे ही तयार झालं आहे. जे रसिकांना नक्की आवडेल असे निर्मिती, दिग्दर्शक प्रदिप गोगटे सांगतात. हे नाटक रंगभूमीवर आपली छाप नक्की सोडेल. प्रामाणिक प्रयत्न आणि प्रचंड कष्ट करून हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आम्ही घेऊन येत आहोत. या नाटकाला रसिकांचे प्रेम, आशिर्वाद लाभावे असे आवाहन निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ यांनी केले आहे.या नाटकाचा तिकीट दर-रु. ३००/-, रु. २००/-, रु. १००/-असा आहे.फोन बुकिंग करण्यासाठी : 8087437309 या नंबरवर संपर्क साधवा.तिकीट विक्री ३० ऑक्टोबर २०२४ पासून थिएटरवर सुरु होणार असून Online Booking : bookmyshow वर करावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
“सौजन्याची ऐशीतैशी”दोन अंकी धमाल विनोदी नाटक,२ नोव्हेंबरला दादरच्या श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात
RELATED ARTICLES