मुंबई : मराठा आरक्षण या प्रश्नावर आझाद मैदान दणाणून सोडणारे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे नेते आबा पाटील यांनी बुधवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित जाहीर पत्रकार परिषदेत राष्ट्रीय मराठा पार्टीत प्रवेश केला.
महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या हक्काच्या लढ्यातील महत्वाचा टप्पा गाठत, मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या नेत्यांनी व आबा पाटील यांनी केलेला हा महत्वाचा मानला जात असल्याचे पार्टीचे अध्यक्ष अंकुशराव पाटील यांनी यावेळी सांगितले.
या निर्णयानंतर मराठा समाजाच्या असंतोषाला एक नवीन दिशा मिळाली आहे. मराठा समाजातील विविध संघटना, मराठा क्रांती ठोक मोर्चा व इतर संघटनांनी
आरक्षणाची ही चळवळ लाखो कार्यकर्त्यांना घेऊन रस्त्यावर लढली. मात्र आरक्षण प्रश्न म्हणावा तसा नाही. म्हणून आता समाजाचे प्रश्न विधानसभेत मांडण्यासाठी पाटील यांच्या प्रवेशाने एक नवी दिशा मिळणार आहे.
पार्टी राज्यभारत शंभर ते सव्वाशे उमेदवार उभे करणार आहे. शेतकरी , शिक्षणात समान संधी, बेरोजगारी आणि सामाजिक न्याय हे जाहीरनाम्याचे प्रमुख मुद्दे असतील. मराठा समाजाच्या विकासासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी आम्ही कुठलाही त्याग करण्यास तयार आहोत,” असे पाटील यांनी स्पष्ट केले.