Wednesday, September 10, 2025
घरमहाराष्ट्रकराड दक्षिण काँग्रेस कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा संपन्न

कराड दक्षिण काँग्रेस कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा संपन्न

प्रतिनिधि : कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा रविवारी  २० ऑक्टोबर  २०२४ रोजी पंकज हाॅटल कराड येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास कार्यकर्त्यांची न भुतो ना भविष्य एवढ्या प्रचंड संख्येने उपस्थिती होती. या विराट जनसमुदायाशी महाराष्र्ट राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री कराड दक्षिणचे शिल्पकार विकासमहामेरु पर्मनंट विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबांनी संवाद साधत विजयाचा निर्धार केला.

कराड दक्षिणमधील जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे  पृथ्वीराज बाबांच्याप्रती असलेल्या प्रेमापोटी विचारापलीकडच्या जमलेल्या गर्दीला पाहून खरच विरोधकाच्या काळजात पराभवाची धडकी भरली असेल जरा मायबाप जनतेची गैरसोय झाली. पण आपल्या लाडक्या नेत्याच्या बाबांच्या प्रेमापोटी सर्वकाही संभाळून घेतले संपूर्ण कराड दक्षिण मतदार संघातील जनतेनी आपल्या कार्यकर्त्यांनी मेळाव्यामध्ये दाखवलेली उपस्थिती ह्यावरुन सिध्द होते ते म्हनजे कराड दक्षिण मतदारसंघातील तुमच्यावरती असलेले निस्वार्थ प्रेम खरंच कराडमधील जनतेच तुमच्या व्यक्तिमत्वावर, स्वभावावर,निष्ठेवर व पारदर्शी गटतट विरहीत कार्यावरती असलेले निस्वार्थ प्रेम पाहुन पुन्हा एकदा याचा प्रत्यय कालच्या कार्यकर्ता निर्धार मेळाव्यात आला हा केवळ मेळावा नसून माझ्या लाडक्या नेत्याच्या विजयाची घोषणाच होती. पृथ्वीराज बाबा तुम्ही ,१४ वर्ष आणि आदरनीय स्व.विलासराव पाटील उंडाळकर काकांनी ४० वर्ष सामाजीक क्षेत्रात २०% राजकारण ८०% समाजकारण करुन जे पेरलं तेच आज उगवलं आहे आणि त्याचे फलित आम्ही सर्व काँग्रेस शिलेदार आणि जनता येनार्‍या २३ तारखेला पाहणारच आहोत आता महाराष्र्टातसुध्दा जनता महापरिवर्तन घडवणार,भ्रष्ट आणि जुमलेबाज युतीला दोन टप्पे न घेता एकाच टप्प्यात आऊट करणार!

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments