मुंबई
:राष्ट्रीय मिल मजदूर संघांच्या नेतृत्वपदी अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर,तर सरचिटणीसपदी गोविंदराव मोहिते यांची काल फेरनिवड झाली.राष्ट्रीय मिल मजदूर संघांच्या पंचवार्षिक नवनियुक्त संयुक्त प्रतिनिधी मंडळाची सभा काल मनोहर फाळके सभागृहात पार पडली.या सभेत वरील प्रमाणे एकमुखी ठरावाद्वारे अध्यक्ष व सरचिटणीस यांची घटनेप्रमाणे आणि लोकशाहीप्रणाली नुसार निवडणूक पार पडली.त्याच प्रमाणे पदाधिकार्यांची पदनिहाय नियुक्तीही आज करण्यात आली. मुंबईत आज आपले अस्तित्व टिकवून असलेल्या एनटीसीच्या चार आणि एक खासगी न्युग्रेट मिळून पाच गिरण्यांतील कामगा रांमधून प्रतिनिधीं बिनविरोध निवडून आले.या निवडून आलेले प्रतिनिधी आणि स्विकृत सदस्य अशा संयुक्त प्रतिनिधी मंडळाचीसभा काल मनोहर फाळके सभागृहात फार पडली.अध्यक्षस्थानी आमदार सचिनभाऊ अहिर होते. प्रतिनीधी मंडळात पुरुषांप्रमाणे स्त्री सदस्यांचा समावेश आहे. या सभेत वरील प्रमाणे संघटना नेतृत्वाची निवड करण्यात आली आहे.या पंचवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम दि.११ ते २१ ऑक्टोबर पर्यंत पार पडला. त्यासाठी निवडणूक समिती गठीत करण्यात आली होती. निवडणूक प्रमुख म्हणून बजरंग चव्हाण यांनी काम पाहिले.
पदाधिका-यांची निवड
सभेने सन्माननिय पदाधिका-याच्या निवडीचे अधिकार अध्यक्ष आणि सरचिटणीस यांना दिले होते.त्या नुसार आज खजिनदारपदी निवृत्ती देसाई, उपाध्यक्षपदीअण्णा शिर्सेकर,बजरंग चव्हाण,सुनिल बोरकर यांची तर सेक्रेटरीपदी शिवाजी काळे यांची निवड करण्यात आली आहे.
संघर्षमयी वाटचाल!
नवनियू्क्त अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांनी सर्व नवनियुक्त प्रतिनिधींचे स्वागत करताना म्हटले आहे, लोकशाहीची थोर परंपरा लाभलेल्या देशाच्या निवडणुकीसह कामगार चळवळीतील कामगार संघटनांच्या संघटनात्मक निवडणुकीच्या इतिहासाची जेव्हा जेव्हा चर्चा होईल, तेव्हा राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल..सन १९९६-९७ पासूनच्या गेल्या २८ वर्षांच्या आपल्या यशस्वी कारकीर्दीत संघटनेला अनेक वादळे आणि संकटांचा सामना करावा लागला,असे सांगून,सचिन अहिर आपल्या भाषणात पुढे म्हणाले, केंद्रसरकारने चार संसदीय विधेयके संमत करुन कामगार चळवळीचे अस्तित्व धोक्यात आणले आहे.त्या वेळी सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांचेही मार्गदर्शनपर भाषण झाले.
सदर नेतृत्व निवडीचे तसेच पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे कामगार वर्गात जोरदार स्वागत होत आहे. •••••काशिनाथ ताकद, प्रसिद्धी प्रमुख
