प्रतिनिधि : आज माजी नगरसेवक हाजी बब्बू खान आणि त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये पुनःप्रवेश केला आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत, तसेच वरिष्ठ नेते अस्लम शेख आणि आमिन पटेल यांच्या साक्षीने हा पुनर्प्रवेश पार पडला.

धारावीकरांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या भविष्याच्या सुरक्षेसाठी हाजी बब्बू खान यांचे पुनरागमन या लढ्याच्या अत्यंत निर्णायक टप्प्यावर घडले आहे.
या प्रसंगी मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी म्हटले, “धारावीच्या विकासासाठी आणि जनतेच्या हक्कांसाठी काँग्रेस ठामपणे उभी आहे. हाजी बब्बू खान यांचे पुनरागमन धारावीच्या एकतेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि फूट पाडणाऱ्या शक्तींना चपराक आहे.”
हाजी बब्बू खान यांचे काँग्रेसमध्ये पुन्हा स्वागत करताना अस्लम शेख आणि अमिन पटेल यांनीही धारावीच्या संघर्षात काँग्रेसची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले आणि लवकरच आणखी जुने साथी काँग्रेसमध्ये परतणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.