Thursday, September 11, 2025
घरमहाराष्ट्रयोगेश त्रिवेदी यांचा वाढदिवस आधार वृद्धाश्रम येथे साजरा ; वयोवृद्धांनी साजरा केला...

योगेश त्रिवेदी यांचा वाढदिवस आधार वृद्धाश्रम येथे साजरा ; वयोवृद्धांनी साजरा केला आनंद सोहळा

मुंबई (प्रतिनिधी) : ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री विजय वैद्य यांच्या निधनानंतर या परिसरात मरगळ झटकून सामाजिक कार्यक्रमात खंड पडू नये म्हणून कंबर कसून उपनगरचा राजाच्या पदाधिकाऱ्यांनी पुनश्च हरि ओम म्हणत सुरुवात केली. बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथील उपनगराचा राजा या विजय वैद्य यांनी स्थापन केलेल्या या संस्थेने वैद्य यांचे सुमारे पन्नास वर्षांचे निकटवर्तीय ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री योगेश वसंत त्रिवेदी यांच्या वाढदिवसानिमित्त आधार वृद्धाश्रम, दौलत नगर बोरीवली पूर्व येथे सुमारे शंभरहून अधिक वयोवृद्धांनी आनंद सोहळा साजरा केला. शिवसेना उपविभाग संघटक सौ रेखा बोऱ्हाडे यांच्या पुढाकाराने झालेल्या या आनंद सोहोळ्यात योगेश वसंत त्रिवेदी आणि सौ. माया योगेश त्रिवेदी आणि उपनगरचा राजा च्या कार्यकर्त्यांनी अल्पोपहार तसेच फळे वितरित केली. वयोवृद्धांनी गाणी सादर केली. मिलिंद कोळवणकर, राजन सावंत, मनीषा परब, रुपाला भाटिया, मिथिलेश सावंत, विक्रांत पाटील, हेमाल ठक्कर, भावना ठक्कर, जिगर भाटिया, कु. प्रथम हेमाल ठक्कर आदी कार्यकर्त्यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments