सातारा(अजित जगताप) : महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आले असून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे . परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात अजिबात आलेली नाही. याबाबत विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न विचारला असता श्वेतपत्रिका काढली जाईल. असे सांगितले. परंतु, भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्रातील गुंतवणूक बाबत श्वेतपत्रिका काढली गेली नाही. असा गोप्यस्फोट महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा येथे केला आहे.
सातारा जिल्ह्यातील काँग्रेस कमिटीचे कार्यकारणीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, युवा नेते एडवोकेट उदयसिंह पाटील- उंडाळकर, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, महिला अध्यक्ष अल्पना यादव, धनश्री महाडिक, रंजनी पवार ,अजितराव चिखलीकर- पाटील, बाबासाहेब कदम, संदीप चव्हाण ,श्रीकांत चव्हाण, सरचिटणीस नरेश देसाई ,विराज शिंदे, जयदीप शिंदे, अमरजीत कांबळे, इमरान बागवान, राजू मुलाणी,डॉ. संतोष गोडसे, मोहनराव देशमुख, मनोजकुमार तपासे, अविनाश नलावडे ,बाबासाहेब कदम, निवासराव थोरात, विश्वंभर बाबर, संजय तडाके, विलास पिसाळ यांच्यासह अनेक राष्ट्रीय काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळेला गद्दारांचा पंचनामा महाराष्ट्र धर्म बुडवला गुजरात चरणी अर्पण केला हे महायुतीचे पाप या पुस्तिकेचे वितरण करण्यात आले. जे इंग्रजांना जमले नाही ते त्यांच्या वारसदारांनी करून दाखवले. यावेळी युतीच्या भ्रष्टाचाराच्या घोटाळाची यादी यावेळी सादर करण्यात आली.
एप्पल कंपनीने महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे ठरवले होते परंतु प्रत्येक टेबलवर वजन ठेवावे लागत होते. त्यामुळे दोन कारखाने तामिळनाडूला व प्रत्येकी एक कारखाना आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यात गेला आहे. टाटा एअरबस चा कारखाना गुजरातला तर लढावी विमानांच्या कारखाना हैदराबादला गेल्याचे श्री चव्हाण यांनी सांगितले.
सध्या मुंबई विकण्याचा डाव केला असून महाराष्ट्रात उद्योगपती अदानी- अंबानी व दिल्लीत दोन नेते बसलेले आहेत. या महाराष्ट्राने १०५ हुतात्म्यांचे बलिदान दिलेले आहे. ते आता सर्व गुजराती लुटत आहेत. असे त्यांनी स्पष्ट केले.
धारावी पुनर्वसनांमधून ६०० एकर जमिनीच्या टेंडर जिंकले असून त्यांना मोफत जमिनी खार पट्टा तसेच कचरा डेपो सुद्धा देण्याचे या सरकारने निर्णय घेतला आहे. सामान्य माणसांचे अक्षरशः आर्थिक पिळवणूक चालवली आहे. या विरोधात महाविकास आघाडी जनतेच्या दरबारात जाणार आहे.
महाराष्ट्रातील महायुतीची सत्ता घालवणे. हाच आमचा उद्देश आहे. याचे त्यांनी पुनर्विचार केला. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर नक्कीच सामान्य माणसांना दिलासा मिळेल .असे स्पष्ट केले.
