Thursday, September 11, 2025
घरमहाराष्ट्रमध्य हार्बर मार्गावर मेगब्लॉक

मध्य हार्बर मार्गावर मेगब्लॉक

मुंबई – रेल्वे रूळ,सिग्नल आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी मध्य रेल्वेने मुख्य आणि हार्बर मार्गावर उद्या रविवार २० ऑक्टोबर रोजी मेगाब्लॉक घेतला आहे. मध्य रेल्वे मार्गावर विद्याविहार आणि भायखळ्यादरम्यान सकाळी १०.३४ ते दुपारी ३.५४ आणि हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी दरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे मध्य रेल्वे मार्गावर कल्याण आणि अंबरनाथ स्टेशनदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर दुपारी २ ते दुपारी ३.१५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात कल्याणहून सुटणाऱ्या डाऊन मार्गांवरील लोकल दुपारी १.३२ ते दुपारी ३.१७ आणि बदलापूरवरून सुटणाऱ्या अप मार्गावरील लोकल दुपारी १.४९ ते दुपारी ३.२२ या वेळेत कल्याण आणि बदलापूर स्टेशनदरम्यान खंडीत करण्यात येणार आहेत. या काळात बदलापूर आणि कर्जतदरम्यान शटल सेवा चालवण्यात येणार आहे.हार्बर मार्गावर सीएसटी आणि कुर्ला स्टेशनदरम्यान डाऊन मार्गावर, तर वडाळा आणि वांद्रेदरम्यान दोन्ही मार्गांवर सकाळी ११.१० ते दुपारी ३.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments