सातारा(अजित जगताप) : नवरात्र उत्सवानिमित्त सातारा शहरात वीरांगना प्रतिष्ठानच्या वतीने मिनी होम मिनिस्टरचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला सर्व जाती धर्मातील सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या महिलांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला .देत खेळात सहभाग घेतला. पैठणी व लेडीज सायकल सह अनेकांना उत्स्फूर्तपण बक्षीस देण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाघाटन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा व दैनिकाच्या क्राईम रिपोर्टर गौरी आवळे, वरिष्ठ सल्लागार तथा ममश्री फूड प्रॉडक्टच्या संस्थापिका कांचन प्रफुल गंगावणे, कार्याध्यक्षा दिपाली शिंदे , सादरकर्ते प्रितम लोखंडे यांनी विविध खेळ घेत महिलांचा उत्साह वाढविला. तामजाईनगर येथील सरीता सकुंडे यांना पैठणी देण्यात आली. तर इतर महिलांना आकर्षक भेट वस्तू देण्यात आली. लकी ड्रॉ च्या माध्यमातून सारीका पंडीत यांना लेडी सायकल व एक ग्रॅम पर्यंत वस्तू भेट दिली. काही वस्तू खरेदीवर कुपन भेट देण्यात आले. मम़श्री फुड प्रोडक्टस् याच्या वतीने शेंद्रिय गुळातील लाडुचे वाटप करण्यात आले. या लाडूचे सर्वांनी कौतुक केले. याप्रसंगी अश्विनी सुर्वे, द्वारका आवळे, मिनाक्षी मोरे, गीता पटेल, कोमल जगताप, निलम आवळे, दुर्वा अवघडे, विद्या गडकरी व महिला, युवती, लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट- साताऱ्यातील ममश्री फूड प्रॉडक्टच्या संस्थापिका सौ .कांचन गंगावणे यदि तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थाच्या आईच्या हातची चव चाखून अनेकांनी त्याचे मनापासून कौतुक केले. ममश्री हे खाद्यपदार्थ सोबतच अगरबत्ती व इतर उत्पादन महिलांसाठी आकर्षक ठरले आहेत.
.