Friday, September 12, 2025
घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रात बहुजन समाज पार्टीचा पहिला आमदार धारावीचा असेल - एन.पी.अहिगार, राज्य प्रभारी...

महाराष्ट्रात बहुजन समाज पार्टीचा पहिला आमदार धारावीचा असेल – एन.पी.अहिगार, राज्य प्रभारी बसपा समाजसेवक मनोहर रायबागे यांचा बहुजन समाज पार्टी मध्ये जाहीर प्रवेश

प्रतिनिधी – धारावीतील कार्यसम्राट समाजसेवक, शिवसेना शिंदे गटाचे विभाग संघटक मनोहर रायबागे यांचा हजारो समर्थकसह शुक्रवार दि 18 ऑक्टोबर 2024रोजी बी.एस. पी.भवन,चेंबूर येथे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी एन.पी.अहिगार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील डोंगरे,मुंबई प्रदेशाध्यक्ष प्रा.प्रवीण धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत बहुजन समाज पार्टीमध्ये जाहीर प्रवेश  झाला. यावेळी मुंबई प्रभारी रामसुमेर जैसवार, श्यामलाल जैसवार, दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल भंडारे तसेच दक्षिण मध्य मुंबईचे उपाध्यक्ष रामब्रिज जैसवार, सुनील शिंदे यांच्यासह बहुजन समाजवादी पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

 आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीचा पुनर्विकास झाला नाही. उद्योजक, विकासक असलेले रायबागे हे धारावीचे बसपाचे पहिले महाराष्ट्राचे आमदार असतील.येथे अनेक वर्ष काँग्रेसच्या आमदारांनी फक्त स्वतःच्या विकासावर लक्ष दिले धारावीला वेठीस धरून स्वतःची ताकद वाढवली. यावेळी येथील जनता गायकवाड परिवाराला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.महाराष्ट्रातला भोजन समाजवादी पार्टीचा आमदार धारावीतील असणार महाराष्ट्र राज्य प्रभारी एन.पी.अहिगार यांनी आपले मत व्यक्त केले. 

 महाराष्ट्रातील बहुजन समाजवादी पार्टीची उमेदवारांची यादी शनिवारी जाहीर केली जाईल. यामध्ये  पहिले उमेदवार धारावीतील मनोहर रायबागे  असतील.असे प्रदेशाध्यक्ष सुनील डोंगरे यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले रायबागे यांना धारावीतील जनतेविषयी प्रेम आहे. त्यांची समाजसेवेशी जोडलेली नाळ कधीच कमी होणार नाही. आपण याआगोदरच बसपामध्ये यायला हवे होते. तरीही आपण आल्यामुळे बसापा मध्ये स्वागत आहे. संपूर्ण बसपाची ताकद लावली जाईल, प्रत्येक कार्यकर्ता आपल्या प्रचारात सामील होईल असे   नंतर राज्यातील  नावे घोषित केले जातील महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील डोंगरे यांनी  सांगितले. यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त केले. 

चौकट 

धारावीत मी अनेक वर्षे काम करत असल्यामुळे मला धारावीतील जनतेला काय हवं याची कल्पना आहे. जनतेला विकासाची गरज आहे.गेली अनेक वर्षे विकासाच्या नावाने राजकारण सुरु आहे. मी अनेक पक्षासोबत काम केले आहे. पण प्रत्येक ठिकाणी पक्ष वाढीसाठी मनापासून काम केले माझ्याकडे आलेला व्यक्ती कधीच नाराज होऊन गेला नाही. याची काळजी मी घेतली आहे.त्यामुळे धारावीचा पुनर्विकास होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे मला मोठा पक्ष उमेदवारी देत असतानाही मी बहुजन समाज पार्टीमध्ये प्रवेश करत आहे. यामागे खूप वेगळी कारणे आहेत. सर्व ताकद देतील पण जनतेला विश्वासाची गरज आहे. त्यांना आता विकास महत्वाचा आहे. त्यामुळे धारावीत बसपाची ताकदही चांगली आहे. आणि मला खात्री आहे मी ज्यांना आजपर्यंत मनापासून सहकार्य केले ते मला नक्कीच मदत करून धारावीतून बसापाचा हत्ती विधानसभेत पाठवतील म्हणून मी बसपा मध्ये आलो आहे. –  मनोहर रायबागे 

 –  मनोहर रायबागे 

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments