मुंबई ः कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी या 150 वर्षांकडे वाटचाल करणाऱ्या संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही (शैक्षणिक वर्ष 2023-24) भंडारी समाजातील दहावी, बारावी आणि उच्चविद्याविभूषित विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यात अर्ज भरून विद्यार्थी गुणगौरव समारंभात सहभागी व्हावे असे आवाहन कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळीू संस्थेचे कार्यवाह अरविंद सुर्वे आणि कार्याध्यक्ष सूर्यकांत बिर्जे यांनी केले आहे.
इयत्ता दहावीच्या परीक्षेत ७० टक्के, बारावी-६५% तसेच पदवी, पदविका, उच्च शिक्षण परीक्षा ६०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या फक्त भंडारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा हा गुणगौरव समारंभ आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विहीत नमुन्यातील प्रवेश अर्ज भरुन देणे आवश्यक आहे. प्रवेश अर्जासोबत शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ च्या मूळ गुणपत्रिकेची स्वसाक्षांकित प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. तसेच भंडारी जातीचा उल्लेख असलेल्या १) वडिलांचा किंवा विद्यार्थ्याचा भंडारी जातीचा दाखला, २) वडिलांचा किंवा विद्यार्थ्याचा शाळा सोडल्याचा दाखला ज्यावर भंडारी ज्ञातीची नोंद असणे आवश्यक, ३) भंडारी मंडळाने दिलेले जात प्रमाणपत्र या पैकी एका दाखल्याची स्वसाक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
कित्ते भंडारी सभागृह, शिवसेना भवन जवळ, गोखले रोड, (उत्तर) दादर, मुंबई-४०००२८ येथे गुरुवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत दुपारी 12.00 ते सायं ७.३० या वेळेत अर्ज स्वीकारले जातील. अधिक माहितीसाठी गुणगौरव समारंभाचे निमंत्रक श्री. संतोष बाबुराव मांजरेकर ((सहसचिव, कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी) यांच्याकडे भ्रमणध्वनी ८३५५९४७३११ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.