विशेष प्रतिनिधी : भंडार गोंदिया लोकसभा क्षेत्राच्या निवडणूक प्रचाराने जोर पकडला असून काल रात्री एक अप्रिय घटना घडून आली. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला एका ट्रकने मागून धडक दिली. यात नाना पाटोले सुखरूप बचावले असले तरी मागे पुढे सुरक्षा असताना सुद्धा असा अपघात घडल्याने घटनेनंतर राजकीय क्षेत्रात चर्चेला आणि आरोप प्रत्यारोपन्ना उधाण आले आहे. भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ काल रात्री हा अपघात झाला. प्रचार आटोपून सुकळी या स्वगावी परत जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली.
महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांना या निवडणुकीत नाना पटोले यांचाच दूसरा चेहरा मानला जात असून या निवडणुकीला नानांनी अधिकच गांभीर्याने घेतले आहे आणि त्यांच्या प्रचार करीत दिवस रात्र एक केली आहे. अशातच कालच्या प्रचार सभा आटोपून नाना पाटोले ही आपल्या ताफ्यासोबत रात्रीच्या सुमारास भंडारा येथून स्वगावी जायला निघाले. दरम्यान भंडाऱ्यावरुन पाच किलोमीटर अंतरावरील भीलवाडा गावाजवळ त्यांच्या ताफ्याला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका अनियंत्रित ट्रकने जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की नाना पटोले यांच्या गाडीचा मागच्या भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. मात्र नशीब बलत्तर असल्याने नानांना अथवा गाडीतील कुणालाही दुखापत झाली नाही. अपघातानंतर नाना पटोलेंनी याची माहिती भंडारा पोलिसांना दिली आणि माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थाळ गाठून कारवाईला सुरुवात केली.
राजकीय हेतूने घातपाताचे आरोप
कल रात्री झालेल्या अपघाताची बातमी कळताच राजकीय क्षेत्रात चर्चे सोबतच आरोप प्रत्यारोपाने जोर पकडले आहे. या अपघातानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी संतापले असून नाना पटोले यांच्या वाहनाला झालेला अपघात हा अपघात नसून राजकीय घातपाता असलत्याचा आरोप कार्यकर्ते करीत आहेत. नाना पाटोले यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या उमेदवारीला आपल्या अस्तित्वाची निवडणूक मनाली असून त्यांनी आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी अख्खा जिल्हा पिंजून काढला आहे. यामुळे विरोधकांना याची धडकी भरली असून त्यातून घडलेला हा प्रकार असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केलेला आहे. दरम्यान या घटनेची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस कार्यकर्ते करीत असून पोलिसांनी ट्रक चलकस ताब्यात घेऊन गांभीर्याने विचारपूस सुरू केली आहे.
विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का? – अतुल लोंढे
“विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौऱ्यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ त्यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला आहे. ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का ? अशी शंका आहे. मायबाप जनतेच्या आशिर्वादाने नाना पटोले साहेबांना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरूप आहेत”, अशी पोस्ट प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली असून त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.