मुंबई : माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने मुंबईच्या सीमेवरील एकूण 5 टोल हलक्या वाहनांसाठी कायमस्वरूपी रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. सोमवारी मध्यरात्रीपासून प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झालेल्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी माजी खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी सोमवारी रात्री 12 वाजता वाशी टोल नाक्यावर जाऊन कार चालकांना फूल आणि लाडू वाटून जल्लोष साजरा केला. ढोलताशांच्या गजरात मोठ्या संख्येने शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वाशी टोल नाक्यावर आनंद साजरा केला. यावेळी राहुल शेवाळे यांच्यासह विभाग प्रमुख अविनाशजी राणे, महिला विभाग प्रमुख सुनीता वैती, माजी नगरसेविका सौ. वैशाली नवीन शेवाळे,चेंबूर विधानसभा प्रमुख संजय राठोड, अणुशक्ती विधानसभा प्रमुख सचिन यादव, वाहतूक सेनेचे इंद्रजीत बल, इंदरपालसिंग मारवा, सहसंपर्कप्रमुख दीपक महेश्वरी यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

कोट–
“माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने मुंबईच्या सीमेवरील 5 टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमुक्ती देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याने जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई महानगर प्रदेशातून दररोज मुंबईत येणाऱ्या लाखो चाकरमान्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून यामुळे मोठ्या प्रमाणात इंधन आणि सामान्य जनतेच्या पैशाची बचत होणार आहे. या टोलमुक्तीमुळे एका कुटुंबात दर महिन्याला सरासरी 5 ते 10 हजार रुपयांची बचत होणार आहे. हा निर्णय सामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनात दूरगामी सकारात्मक परिणाम घडवणारा ठरला आहे. या ऐतिहासिक निर्णयासाठी माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि महायुती सरकारचे राज्यभरातील जनतेच्या वतीने मी शतशः आभार मानतो.”राहुल रमेश शेवाळे, माजी खासदार
– राहुल रमेश शेवाळे, माजी खासदार