मुंबई (रमेश औताडे) : लोकशाहीच्या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी मतदानाचे परिवर्तन होणे महत्त्वाचे आहे. मात्र जिथे मतदारांचा सन्मान होत नाही तिथे आम्ही मतदानच करणार नाही असा इशारा आंबेडकर रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी दिला.

नागपूर येथे धम्म चक्र परिवर्तन दिनानिमित्त आयोजित मतदार परिवर्तन मेळाव्यात ते बोलत होते. मतदारांनी आपल्या मतांचा अधिकार जर, जात, धर्म, परंपरागत पक्ष,घराणेशाही यात अडकवून ठेवला तर लोकशाहीला ते घातक ठरते असे बागडे यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालिक बांगर, प्रमुख पाहुणे रेखा राणगावकर होत्या. देवेंद्र बागडे, उद्धव तायडे, पौर्णिमा पाईकराव, डॉ सुधा जनबंधू, विकास काटे, नामदेवराव निकोसे, न्यायाधीश सुरेश घाटे, उत्कर्षा थुल, सुनिता गायकवाड, दिलिप कदम, इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पुरातत्व अधिक्षक नामदेवराव निकोसे यांनी नागपूर जिल्ह्याच्या वतीने संघर्ष निधी म्हणून पांच लाख एकावन्न हजार रुपये देण्याची घोषणा केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनेची बैठक आयोजित करण्यात येणार असून त्यावेळी अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार आहे असे नारायण बागडे यांनी सांगितले. वैशाली तभाने यांनी मान्यवरांचे स्वागत, सूत्रसंचालन प्रा.रमेश, आभार प्रदर्शन मामासाहेब मेश्राम यांनी केले.