Sunday, August 3, 2025
घरमहाराष्ट्रसाताऱ्यात 82 वा लष्करी कॉर्पस डे साजरा ….

साताऱ्यात 82 वा लष्करी कॉर्पस डे साजरा ….



प्रतिनिधी(अजित जगताप) : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यात लष्करी सेवेमध्ये देश सेवा करण्याची परंपरा आहे. याच लष्करी सेवेतील आजी-माजी सैनिकांनी साताऱ्यात नुकताच 82 वा लष्करी कॉर्पस डे मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला.
पश्चिम महाराष्ट्र, सातारा जिल्हात पहिल्यांदाच इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनियर (ई एम ई) परिवारातील सेवानिवृत्त व सेवेमध्ये असलेले सैनिक या आनंदी सोहळ्यामुळे भारावून गेले होते . यापूर्वी असा सोहळा पश्चिम महाराष्ट्रात साजरा झाला नव्हता. तो सातारा जिल्ह्यात साजरा करून भविष्यात बडा खाना कार्यक्रम संपूर्ण सैनिक कुटुंबीय साठी घेण्याचे यावेळी आग्रहाची मागणी करण्यात आली. त्याला सर्व आजी-माजी सैनिक अधिकाऱ्यांनी उदंड प्रतिसाद दिला. सातारा येथे ८२ व्या ई एम ई कॉर्पस डे सोहळा पहिल्यांदाच करण्यात सातारा रहिमतपूर रस्त्यावरील साई संगम या हॉटेलमध्ये करण्यात आला. यावेळी लष्करी शिस्त व सेवेची चुणूक पाहण्यास मिळाली. एकमेकांचा परिचय व एकमेकांची आपुलकीने विचारपूस करणारे वरिष्ठ अधिकारी पाहून अनेकांचे मन भारावून गेले.
या कार्यक्रमासाठी कराड, फलटण, कोरेगाव, रहिमतपूर, जावळी, तरडगाव, महाबळेश्वर, खंडाळा, वाई, पाटण, पाचवड, पाचगणी, दहिवडी, सातारा, अपशिंगे, नागठाणे, मेढा, वडूज, औंध, कातरखटाव, पुसेगाव, तासगाव, परळी, कळंबे, मायणी, गो, कोडोली, लिंब सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यातून सेवानिवृत्त व सेवेमध्ये असलेल्या सैनिकांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार व दीप प्रज्वलित करून या सोहळ्याला सुरुवात झाली.

राष्ट्रगीत व कॉर्पस गीत गाऊन सर्वांनाच प्रेरणा देण्यात आली. यावेळी अनेकांनी बहुमूल्य मार्गदर्शन करून जे सेवेसाठी झटणाऱ्या सैनिकांच्या कर्तबदारीचाही अनेकांनी अनुभव घेतला. सैनिकांसाठी विविध कल्याणकारी योजना कार्यान्वित करण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे अनेकांनी सांगितले. या कार्यक्रमाचे या सोहळ्याचे मार्गदर्शक दिलीप वाघ दिलीप भोसले यांच्यासह सुभेदार विजय जमदाडे सुभेदार संतोष वर्गीय सुभेदार रामदास माने सुभेदार शिवाजी जाधव सुभेदार अरविंद यादव यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले. या सोहळ्यासाठी खास केक तयार करून तो कापण्यात आला. तसेच स्नेहभोजनसह खिरीचा आस्वाद सर्वांनी घेतला.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments