मुंबई / रमेश औताडे – प्रतिनिधी
सरकारी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे खरिब व रब्बी हंगामात नोंदीचा गोंधळ झाल्याने धान पिकाचे शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे न मिळाल्याने शेतकरी नेते लोकमित्र रमेश यशवंत हिंदुराव यांनी अन्नत्याग उपोषणाचा इशारा दिला आहे.
भात धान सन २०२० व २०२१ मधील शेतकऱ्यांचा राहीलेला बोनस मिळावा म्हणून शेतकरी नेते रमेश हिंदुराव हे ४ ऑक्टोबर पासून उपोषणास आझाद मैदानात बसले आहेत. ७ दिवस होऊनही मंत्री छगन भुजबळ यांनी शेतकऱ्याची भेट न घेतल्याने शेतकऱ्यामध्ये सरकार बदल तिव्र नाराजी दिसून येत आहे.
याबाब आम्ही शेतकरी १८ मे २०२२ पासून पत्रव्यहवार करीत आसून उपमुख्य मंत्री अजित पवार , मंत्री छगन भुजबळ , मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आश्वासन देऊनही शब्द पुर्ण न केल्याने सोमवार १४ ऑक्टोबर पासून मुरबाड तहसील कार्यालय येथे शेतकरी अन्नत्याग उपोषणाला बसणार आहेत. भात धान या बाबतचा अहवाल मंत्रालयात सादर झाला असून त्यावर सरकारने कार्यवाही करावी व लाडक्या बहिणी प्रमाणे वंचीत लाडक्या भावांना मदत करावी असे शेतकरी बांधव बोलत आहेत.
सरकारी कारभाराविरोधात शेतकऱ्यांचे अन्नत्याग
RELATED ARTICLES