पाटण : ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवरील ‘मुरांबा’ या लोकप्रिय मालिकेत रमा ही मुख्य भूमिका साकारत घराघरात पोहाचलेली अभिनेत्री शिवानी मुंढेकर यांना शेतीमित्र डाॅ.संदीप डाकवे यांनी अक्षरगणेशा भेट दिला. यावेळी त्यांच्या समवेत सौ. रेश्मा डाकवे, शिवानी मुंढेकर यांचे आई, वडील, अन्य कुटूंबीय आणि इतर नातेवाईक उपस्थित होते. शिवानी यांनी डाॅ.संदीप डाकवे राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ‘‘अक्षरगणेशा खूप सुंदर आहे, थॅंक्यू सो मच..’’ अशा शब्दात अभिनेत्री शिवानी मुंढेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मुरांबा या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मुळची कराडची असलेली शिवानी यांनी आपल्या अभिनयाने या मालिकेत छाप उमटवली आहे.
दरम्यान, डाॅ.संदीप डाकवे यांनी आपल्या वडिलांवर लिहलेल्या ‘तात्या’ या पुस्तकाची एक प्रत शिवानी मुंढेकर यांना दिली. कला जोपासत डाॅ.संदीप डाकवे यांनी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी दिलेले योगदान उल्लेखनीय स्वरुपाचे आहे.
यापूर्वीही त्यांनी विविध क्षेत्रातील सुमारे 14 हजाराहून अधिक मान्यवरांना कलाकृती दिल्या आहेत. ज्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड आणि वर्ल्ड ग्रेटेस्ट बुक ऑफ रेकाॅर्ड मध्ये तीनदा, हायरेंज बुक ऑफ रेकाॅर्ड, आणि द ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकाॅर्ड या पुस्तकांनी घेतली आहे.
अक्षरगणेशा, शब्दचित्रे आणि चित्रकलेच्या अन्य माध्यमातून मराठी चित्रपट सृष्टीतील नामवंत दिग्गज सेलिब्रिटींना आपल्या कलेच्या माध्यमातून प्रेमात पाडणाऱ्या डाॅ.संदीप डाकवे यांना खूप शुभेच्छा..!
