प्रतिनिधी : महोदय महाराष्ट्र शासन राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षामार्फत केईएम वैद्यकीय विभाग कक्षामार्फत बुधवार दि ९ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी दहा ते दोन पर्यंत संपूर्ण आरोग्याच्या चाचण्या वैद्यकीय उपचार मोफत औषध व आभा कार्ड नोंदणी याकरिता धारावीतील जय भवानी क्रीडा मंडळाने मोफत वैद्यकीय सर्वो उपचार विभागातील लोकांकरिता स्थळ श्री गणेश विद्यामंदिर हायस्कूल समोर धारावी येथे आयोजित करण्यात आले होते यावेळी केईएम हॉस्पिटलचे डॉक्टर प्राध्यापक अमित भोंडवे व त्यांची टीम यांनी या शिबिरामध्ये सहभागी झालेल्या शेकडो नागरिकांना तपासणी व उपचार करून मोफत औषधे देण्यात आली तसेच आभा कार्डची नोंद करण्यात आली यावेळी तेरा डॉक्टर पाच संयोगिता मेडिकल स्टाफ यांच्यासह धारावी शास्त्रीनगर दवाखाना डॉक्टर व सी एच व्ही यांचेही सहकार्य लाभले. सदर कार्यक्रम जय भवानी क्रीडा मंडळाचे संयोजक व समाजसेवक गिरीराज शेरखाने गौतम हटकर व दिलीप गाडेकर स्थानिक कार्यकर्ते यांनी शिबीर यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले.
